दोन 'मिस कॉल'ने केला प्रणिताचा घात

By Admin | Updated: July 31, 2014 15:23 IST2014-07-31T15:01:10+5:302014-07-31T15:23:18+5:30

पत्नी प्रणिताच्या मोबाइलवर दोन 'मिस कॉल' आल्याने तिच्यावर संशय निर्माण झाला. त्यातून तिचा निर्घृण खून केला, अशी कबुली अटकेतील नितीन गायकवाडने पोलिसांकडे दिली.

Two 'miss calls' killed Prannita's assault | दोन 'मिस कॉल'ने केला प्रणिताचा घात

दोन 'मिस कॉल'ने केला प्रणिताचा घात

>धुळे : पत्नी प्रणिताच्या मोबाइलवर दोन 'मिस कॉल' आल्याने तिच्यावर संशय निर्माण झाला. त्यातून तिचा निर्घृण खून केला, अशी कबुली अटकेतील नितीन गायकवाडने पोलिसांकडे दिली. विषप्रयोगासाठी आणलेले गोचीड मारण्याचे औषध त्याने स्वत: प्राशन केल्याचेही तपासात उघड झाले आहे. 
लग्नानंतर पणिताच्या मोबाइलवर दोन 'मिस कॉल' आले होते. तिने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे नितीनच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले. मिस कॉलची त्याने खात्री केली. परंतु काही माहिती मिळाली नाही. त्याने प्रणिताला संपविण्याचे ठरविले. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. मंगळवारी व बुधवारी तपासाधिकारी उपनिरीक्षक नवनाथ लहांगे यांनी गायकवाडला बोलते केले.

Web Title: Two 'miss calls' killed Prannita's assault