शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

तुकोबारायांचे गुरुवारी तर माऊलींचे शुक्रवारी प्रस्थान

By admin | Updated: June 19, 2014 03:15 IST

आषाढी वारीनिमित्त जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे १९ जून रोजी, तर कैवल्यसम्राट चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे २० जूनला

अकलूज (ता. माळशिरस) : आषाढी वारीनिमित्त जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे १९ जून रोजी, तर कैवल्यसम्राट चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे २० जूनला श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. संत तुकाराम महाराजांच्या अश्वांचे अकलूजहून श्री क्षेत्र देहूकडे बुधवारी प्रस्थान झाले असून, अंकोलीशितोळे येथून निघालेले श्री ज्ञानेश्वर माऊलींचे दोन अश्व गुरुवारी आळंदीत दाखल होणार आहेत.श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे १९ जून रोजी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत असून, पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असणार आहे. २० जून रोजी आकुर्डी, २१ जून व २२ जून पुणे, २३ लोणी काळभोर, २४ ला यवत, २५ रोजी वरवंड, २६ रोजी उंडवडी गवळ्यांची, २७ रोजी बारामती, २८ रोजी सणसर, २९ रोजी अंथुर्णे, ३० रोजी निमगाव केतकी, १ जुलै व २ जुलै रोजी इंदापूर, ३ रोजी सराटी, ४ रोजी अकलूज, ५ रोजी बोरगाव, ६ रोजी पिराची कुरोली, ७ रोजी वाखरी येथील मुक्कामानंतर सोहळा ८ जुलै रोजी पंढरपूर मुक्कामी पोहोचणार आहे.पालखी सोहळ्यात बेलवडी येथे मेंढरांचे गोल रिंगण होणार असून, इंदापूर व अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात अश्वांचे गोल रिंगण होणार आहे. माळीनगर, बाजीराव विहीर व पादुका विसावा मंदिर येथे अश्वांचे उभे रिंगण होणार आहे. या पालखी सोहळ्यात स. म. शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील व माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे दोन अश्व सहभागी होत असून या अश्वांचे बुधवारी सकाळी ९ वाजता श्री क्षेत्र देहूकडे प्रस्थान झाले.श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २० जून रोजी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत असून, पहिला मुक्काम गांधी वाड्यात असणार आहे. २१ व २२ रोजी पुणे, २३ व २४ रोजी सासवड, २५ रोजी जेजुरी, २६ जूनला वाल्हे, २७ व २८ रोजी लोणंद, २९ रोजी तरडगाव,३० व १ जुलै रोजी फलटण, २ जुलै रोजी बरड, ३ जुलै रोजी नातेपुते, ४ जुलै रोजी माळशिरस, ५ जुलै रोजी वेळापूर, ६ जुलै रोजी भंडीशेगाव, सोमवार ७ जुलै रोजी वाखरी मुक्कामानंतर ८ जुलै रोजी पंढरपूर मुक्कामी पोहोचणार आहे. (प्रतिनिधी)