शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तृप्ती तुपे खून खटला जलदगती न्यायालयात चालणार

By admin | Updated: September 10, 2014 02:57 IST

पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील दहावीतील विद्यार्थिनी तृप्ती तुपे हिचा अत्याचार करून खून केल्याचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पारनेर (जि.अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील दहावीतील विद्यार्थिनी तृप्ती तुपे हिचा अत्याचार करून खून केल्याचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याशी त्यासंदर्भात बोलणे झाल्यानंतर त्याला गती मिळाली. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून खटला घेण्यास संमती दिल्याची माहिती मिळाली आहे.तालुक्यातील अळकुटी येथील साईनाथ विद्यालयातील दहावीतील विद्यार्थिनी तृप्ती तुपे ही लोणी मावळाला तिच्या घरी जात असताना तीन नराधमांनी तिचा खून केल्याची घटना मागील महिन्यात घडली होती. गावातीलच संतोष लोणकर, सुनील लोणकर व विहिरीचे खोदकाम करणारा दत्ता शिंदे यांनी तृप्तीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले होते. राज्य सरकारने प्रकरणात लक्ष घालावे यासाठी पारनेर तहसील कार्यालयावर अण्णा हजारे यांनी मोर्चा काढून घटनेचा निषेध केला होता. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्र पाठवून प्रकरण जलदगती न्यायालयात पाठविण्याची मागणी केली होती. त्यानंतर अण्णांनी रविवारी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांशी चर्चा केली. (प्रतिनिधी)