शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

द्रुतगती मार्गावर ट्रॉमा सेंटर; एमएसआरडीसीचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 07:01 IST

महामार्गावरील अपघातग्रस्तांना मिळणार जीवदान

पुणे : पुणे-मुंबई महामार्गावरील वाढते अपघात लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) महामार्गावरील ओझार्डे या गावात ट्रॉमा केअर सेंटर सुरू केले जाणार आहे. त्यामुळे महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर वेळीच उपचार होणार असल्याने त्यांना जीवदान मिळणार आहे.पुणे-मुंबई प्रवास जलद गतीने व सुखकर व्हावा, या उद्देशाने एमएसआरडीसीतर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, महामार्गावरील अपघातांचे प्रमाण फारसे कमी झालेले नाही. महामार्गावर २००६ पासून २०१७ पर्यंत पाच हजारांहून अधिक अपघात झाले आहेत. त्यात तब्बल दीड हजार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर २०१८ या वर्षातही अनेक अपघात झाले असून, अनेकांना त्यात आपला जीव गमवावा लागला आहे.महामार्गावर अपघात झालेल्या काही अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी मृत्यू झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार एमटीडीसीतर्फे लवकरच महामार्गावर पवना मेडिकल फाऊंडेशनच्या मदतीने ट्रॉमा केअर सेंटर सुरू केले जाणार आहे.ट्रॉमा केअर सेंटरसाठी साडेसात लाख खर्चमहामार्गावरील अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या रुग्णांवर तत्काळ उपचार करण्याची आवश्यकता असते. ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्णांवर तत्काळ उपचार करता येणार आहेत. तसेच या सेंटरमध्ये आवश्यक उपचार केल्यानंतर संबंधित रुग्णांना शहरातील मोठ्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी घेऊन जाता येईल. या ट्रॉमा केअर सेंटरसाठी सुमारे साडेसात लाख रुपये खर्च येणार आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईPuneपुणे