शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी कोठडीतील जेवणास कंटाळले

By admin | Updated: July 5, 2017 05:09 IST

मंजुळा शेट्ट्ये हत्या प्रकरणात अटक केलेल्या जेलरसह सहाही संशयित आरोपींनी घरचे जेवण मिळावे, यासाठी किल्ला कोर्टात केलेला अर्ज फे

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मंजुळा शेट्ट्ये हत्या प्रकरणात अटक केलेल्या जेलरसह सहाही संशयित आरोपींनी घरचे जेवण मिळावे, यासाठी किल्ला कोर्टात केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. आरोपींनी मुलांना भेटण्यासाठी केलेली विनंती मान्य करण्यात आली आहे. अवघी दोन अंडी आणि तीन पावांच्या हिशेबावरून महिला कैदी मंजुळाला अमानुष मारहाण झाली होती, त्यात उपचाराअभावी तिचा मृत्यू झाला. तिच्या हत्येप्रकरणी जेलर पोलीस उपनिरीक्षक मनीषा पोखरकर, अंमलदार बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे यांना अटक करण्यात आली आहे. त्या गुन्हे शाखेच्या कोठडीत आहेत. आरोपी तीन दिवसांतच कोठडीतील जेवणाला कंटाळल्या आहेत. शेट्ये हत्या प्रकरणात आरोपींचे जबाब नोंदविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहेत. त्या पाठोपाठ तपास अधिकारी प्रभा राऊळ यांनी दंगलीच्या गुन्ह्यांचाही तपास सुरू केला आहे. पाच अधिकाऱ्यांच्या पथकाने भायखळा कारागृहातील दंगलीच्या तपासाला मंगळवारपासून सुरुवात केली आहे. महिला कैद्यांचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. तपासाअंती लवकरच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. मंजुळाच्या डोक्यावर १४ ते १८ जखमा मंजुळाचा शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालात तिच्या डोक्यावर १४ ते १८ जखमांसह शरीरावर अंतर्गत व बाह्य भागांवर जखमा आढळूनन आल्या असून त्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. यात गुप्तांगातील जखमांबाबत काहीही माहिती मिळाली नसल्याचे समजते.प्रवीण दीक्षित करणार चौकशीराज्य महिला आयोगाने मंजुळा शेट्येच्या हत्येची दखल घेत याचिका दाखल केली आहे. याच्या अधिक तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्यात आले आहे. एसआयटीत राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्यासह निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे आणि स्वयंसेवी संस्थेच्या अंजली देशपांडे यांची नियुक्ती केली आहे. मंजुळाच्या हत्याप्रकरणासह राज्यातील कारागृहातील महिला कैद्यांना पुरविण्यात येणारा आहार, आरोग्य, सुरक्षितता आदींची चौकशी समिती करणार आहे. अर्ज फेटाळला मंजुळा शेट्ट्ये हत्याप्रकरणात साक्ष देण्यासाठी इंदिरा करकेरा महिला कैद्याने अर्ज केला होता. मात्र, त्या अर्जावर कुणाचीही स्वाक्षरी नसल्याने, न्यायालयाने तो अर्जही फेटाळून लावला आहे.