शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 16:29 IST

एखादा आरोप सिद्ध करून कुणी दाखवला त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात. याचा अर्थ शासन या सगळ्याला संरक्षण देत आहे असा आरोप पवारांनी केला.

मुंबई -  आजच्या मोर्चाने जुन्या घटना आठवल्या. महाविद्यालयात शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रासाठी असे मोर्चे निघाले. काळा घोडा आणि परिसरात असणारे हे मोर्चे एकप्रकारचा इतिहास घडवणारे मोर्चे होते. त्या मोर्चानंतर आज इतक्या मोठ्या संख्येने जी एकजूट लोकांनी या मोर्चात दाखवली ती संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण करून देणारी आहे असं शरद पवारांनी म्हटलं. विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात काढलेल्या सत्याच्या मोर्चात ते सहभागी झाले होते. 

यावेळी शरद पवार म्हणाले की, आपण एक महत्त्वाचा विषय हाती घेतला आहे. आम्ही स्वत:साठी काहीही मागत नाही. लोकशाहीत संविधानाने जो अधिकार सगळ्यांना दिला आहे त्याचे जतन करण्याची वेळ आली आहे. निवडणुका झाल्या, त्यात विशेषत: विधानसभा निवडणुकीत जे काही प्रकार घडले त्यामुळे सामान्य माणसांचा संसदीय लोकशाहीवरील विश्वासाला धक्का बसला. आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत. सोलापूरचे आमदार उत्तम जानकर यांनी त्यांचे अनुभव तुम्हाला सांगितले. सत्तेचा गैरवापर सातत्याने केला जात आहे. राजकीय मतभेद असू शकतात. निवडणुकीत संघर्ष असू शकतो परंतु या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावे लागेल. या देशातील मतांचा अधिकार, लोकशाहीचा अधिकार जतन करणे हे आमचे कर्तव्य आहे असा निर्धार केला पाहिजे असं त्यांनी सांगितले.

तसेच काही ठिकाणी लोक तक्रारीसाठी पुढे आले. बनावट आधार कार्ड बनवले जाते अशी माहिती दिली, त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सिद्ध करून दाखवा असं आव्हान दिले. जेव्हा बनावट आधार कार्ड दाखवून दिले. त्यानंतर ज्याने हा आरोप सिद्ध करून दाखवला त्याच्यावर गुन्हा दाखल केला. हा कुठला न्याय..जर एखादा आरोप सिद्ध करून कुणी दाखवला त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात. याचा अर्थ शासन या सगळ्याला संरक्षण देत आहे. त्यामुळे तुमची आणि माझी जबाबदारी आहे. काहीही करा परंतु आम्ही या मतदानातील चोरी थांबवणार असा इशारा शरद पवारांनी दिला आहे.

दरम्यान, आज इथे असणाऱ्या अनेक पक्षाची विचारधारा वेगळी आहे. कधी मतभेदही असतात. पण आज देशातील संसदीय लोकशाही टिकवायची असेल. मतांचा अधिकार टिकवायचा असेल आपल्याला एक व्हावे लागेल असं आवाहन शरद पवारांनी लोकांना केले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Pawar recalls Samyukta Maharashtra movement at opposition's election commission protest.

Web Summary : Sharad Pawar likened today's opposition march against the Election Commission to the Samyukta Maharashtra movement. He emphasized protecting constitutional rights and accused the government of suppressing dissent regarding voter fraud, urging unity to safeguard democracy.
टॅग्स :MNSमनसेSharad Pawarशरद पवारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे