शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 16:41 IST

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालानुसार, महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रामध्ये कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबळीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालानुसार, महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'लाडकी सून' या अभियानाची सुरुवात केली. या अभियांतर्गत राज्यातील पीडित महिलांची मदत केली जाईल, यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे.

नुकतेच एकनाथ शिंदेंनी 'लाडकी सून' अभियानासंदर्भात त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून माहिती दिली. ते म्हणाले की, "महाराष्ट्रात आता इथून पुढे आमच्या लेकी-सुनांवर आम्ही कोणताही अन्याय होऊ देणार नाही. कारण महाराष्ट्राच्या लेकी-सुना सुरक्षित, तर महाराष्ट्रही सुरक्षित राहील. प्रत्येक घरातली सून ही माझी आणि प्रत्येक शिवसैनिकाची लाडकी बहीण आहे. अशा लाडक्या बहिणींचा आणि सुनांचा छळ करणारी वृत्ती ही समाजासाठी कलंक आहे. अशी वृत्ती ठेचूनच काढली पाहिजे. त्यांना अद्दल घडवली पाहिजे. त्यामुळे सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल."

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, "राज्यातील महिलांच्या संरक्षणासाठी 'लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन' हे अभियान आपण हाती घेत आहोत. यापुढे शिवसेनेच्या शाखा हे या लाडक्या सुनांचे हक्काचे माहेर असेल, हे साऱ्यांनीच लक्षात ठेवा. महाराष्ट्रातल्या समस्त लाडक्या बहिणींनी, लाडक्या सुनांनी इथून पुढे कोणत्याची दबावाला बळी पडू नये. तुमच्यावरचा दबाव झुगारून टाका. लाडक्या सुनांच्या मदतीसाठी शिवसेनेने एक हेल्पलाइन सुरू केली आहे."

महिलांच्या मदतीसाठी शिंदे गटाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला. पीडित महिला मदतीसाठी ८८२८८६२२८८ / ८८२८८९२२८८ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकतात. "तुमच्या एका फोननंतर शिवसेनेच्या रणरागिणी तुमच्या मदतीला नक्की येतील. कायदेशीर मदत लागली, तर तीही या अभियानाच्या माध्यमातून दिली जाईल. छळ करणाऱ्यांना आधी समजावून सांगितलं जाईल. त्यानंतरही त्यांच्यात सुधारणा झाली नाही, तर मग काय करायचं, ते आमच्या शिवसेनेच्या रणरागिणींना चांगले माहीत आहे", असेही शिंदे म्हणाले.

नारी शक्ति है, सम्मान है,नारी गौरव है, अभिमान है,नारी ने ही ये रचा विधान है,नतमस्तक इसको प्रणाम है,नारी के सम्मान के खातिर एक कदम हमने बढ़ाया है

या नारीशक्तीला वंदन करून आज आपल्या सुना सुरक्षित राहतील हा संकल्प करू या. तसेच, 'लाडक्या सुनेचं रक्षण, हेच शिवसेनेचं वचन !' हे अभियान यशस्वी करूयात, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना