शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

चोरांच्या झटापटीत प्रवाशावर हल्ला

By admin | Updated: August 24, 2016 01:53 IST

आपले सामान वाचवण्यासाठी चोरांच्या टोळक्याशी एका प्रवाशांने पाठलाग करुन त्यांच्याशी झटापट केली.

मुंबई : आपले सामान वाचवण्यासाठी चोरांच्या टोळक्याशी एका प्रवाशांने पाठलाग करुन त्यांच्याशी झटापट केली. यात पाच जणांच्या एका टोळीने प्रवाशावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात प्रवासी गंभीर जखमी झाला. घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) अवघ्या दोन तासांत गुन्ह्याचा छडा लावला व आरोपींना अटक केली. ही घटना सोमवारी पहाटे माहीम स्थानकाजवळ घडली. सोमवारी पहाटे ५.१0 च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या तिकीट बुंकींग जवळ (माटुंगा दिशेने) अरविंद कुमार पांडे हा झोपला होता. त्यावेळी त्याच्या डोक्याखाली सामानाने भरलेली बॅग होती. ही बॅग खेचून एका चोराने पळ काढला. बॅग घेऊन पळणाऱ्या चोराचा पांडे याने त्वरीत पाठलाग करण्यास सुरुवात केली. प्लॅटफॉर्मच्या शेवटापर्यंत गेल्यानंतर चोराने ट्रॅकच्या दिशेने धाव घेतली. यात पांडेने पाठलाग करुन चोराला पकडले आणि त्याच्याशी झटापट सुरु केली. झटापट सुरु असतानाच चोराचे आणखी चार साथिदार दाखल झाले आणि त्यांनी पांडेला मारहाण करण्यास सुरुवात केली. यातील एकाने धारदार शस्त्राने पांडेच्या पोटावर वार केले व तेथून पळ काढला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याचवेळी रेल्वे ट्रॅकवर कर्तव्यावर असणाऱ्या रेल्वे पोलिसाने जखमी पांडेला पाहिले आणि अन्य पोलिसांना याची माहिती देत सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर सविस्तर माहिती घेतली असता स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली व वेगाने तपास करण्यात आला. लोहमार्ग पोलीस आयुक्त निकेत कौशिक व पश्चिम रेल्वे पोलीस उपायुक्त दिपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे विभागाचे सह पोलीस आयुक्त केंद्रे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक पवार व धनवटे यांनी यशस्वीरित्या तपास केला. (प्रतिनिधी)