शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

...तर त्यांना लाथाडले असते!

By admin | Updated: September 29, 2014 07:35 IST

भाजपा हा वाळवीसारखा पक्ष आहे. कोपऱ्याने खणत जातो. मी उद्धवच्या जागी असतो तर एक महिन्यापूर्वीच भाजपाला लाथ मारून गेलो असतो

मुंबई : भाजपा हा वाळवीसारखा पक्ष आहे. कोपऱ्याने खणत जातो. मी उद्धवच्या जागी असतो तर एक महिन्यापूर्वीच भाजपाला लाथ मारून गेलो असतो. परंतु राज्यातील युती दुभंगलेली असताना केंद्रात व महापालिकेत एकत्र राहण्याचे हे शिवसेनेचे ढोंग कशाला, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केला. भाजपाबरोबर शिवसेनेलाही राज यांनी टीकेचे लक्ष्य केल्याने उद्धव-राज यांच्या एकत्र येण्याची शक्यता दुरावली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मनसेच्या विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा शुभारंभ कांदिवली येथील जाहीर सभेने झाला. राज म्हणाले, युती टिकणार नाही असे अनेक जण सांगत होते तर ते उद्धवला कसे कळले नाही? शेवटपर्यंत हे लाचारी का करीत राहिले? मी असतो तर एक महिन्यापूर्वीच लाथ मारून गेलो असतो. चिंतामणराव देशमुख यांचे दाखले हे देतात. मात्र तोच बाणेदारपणा शिवसेनेने दाखवला नाही. भाजपाने एवढा अपमान केल्यावर केंद्रातील मंत्रीपद ठेवता, महापालिकेतील युती ठेवता हे पाहिल्यावर तुम्ही दुभंगलेले आहात यावर विश्वास कसा ठेवायचा? महापालिकेतील युती तोडली तर यांचा इन्कम सोर्स बंद होईल. त्यामुळे हे ढोंग कशाला माजवता, असा टोलाही राज यांनी हाणला. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कधीच महापालिकेतील सत्तेला लाथ मारली असती. ठाणे महापौर पदाच्या निवडणुकीत एका नगरसेवकाने गद्दारी केली. त्यामुळे चार वर्षांची सत्ता बाकी असताना ती सोडली, याची आठवण त्यांनी करून दिली. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाचे अतुल भातखळकर हे राम नाईक यांनी उत्तर भारतीयांचे प्रस्थ वाढवल्याने तर अहमदनगरमधील सदाशिव लोखंडे हे मतदारसंघाचे आरक्षण बदलल्याने मनसेची उमेदवारी मागायला आले होते. त्यावेळी मी नितीन गडकरी यांना दूरध्वनी करून भाजपाची ही पार्सल घेऊन जायला सांगितले होते, असा गौप्यस्फोट करून राज म्हणाले की, माझी भाजपाबरोबर युती नसतानाही इतक्या वर्षांचे संबंध पाहून मी त्यावेळी तसा वागलो आणि आता तेच भाजपावाले माझा आमदार पळवतात. त्यांना लाज कशी वाटत नाही. (विशेष प्रतिनिधी)