शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

...तर आपण एकटे लढू, उद्धव ठाकरे यांची मेळाव्यात घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 07:55 IST

Uddhav Thackeray News: आपण भ्रमात राहिलो म्हणून आपली फसगत झाली. तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगा, आपल्याशी कपटाने वागणाऱ्यांना उचलून आपटण्याची हिंमत तुम्ही दाखवणार असाल, सूड घेणार असाल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मी एकट्याने लढल्याशिवाय राहणार नाही.

मुंबई - आपण भ्रमात राहिलो म्हणून आपली फसगत झाली. तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगा, आपल्याशी कपटाने वागणाऱ्यांना उचलून आपटण्याची हिंमत तुम्ही दाखवणार असाल, सूड घेणार असाल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मी एकट्याने लढल्याशिवाय राहणार नाही. महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेईन, अशा शब्दांत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल भाष्य केले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी अंधेरी येथे आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पालकमंत्री पदासाठी रस्त्यावर टायर जाळणारे, बाळासाहेबांचे शिवसैनिक असूच शकत नाहीत, अशी टीका करताना हिम्मत असेल तर एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या आणि जिंकून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदा समोर भेटत आहे. जो निकाल लागला तो पटणारा नाही. कितीजण सोबत आहे हे पाहण्यासाठी मोठ्या मैदानात मेळावा घेतला आहे. मला ही जागा शिवसेनाप्रमुखांनी दिली आहे. जोपर्यंत शिवसैनिक सोबत आहे तोपर्यंत ही जागा सोडणार नाही. पण, बाळासाहेबांचे विचार सोडले असे एकही निष्ठावंत म्हणाला, तर हे पदही सोडेन, असे ते म्हणाले. उद्धवसेनेचे ऑनलाइन सदस्य नोंदणीचे उद्घाटन आणि सक्रिय सदस्य अभियानाचा शुभारंभ ठाकरे यांनी केला.

जय शिवराय, जय भवानी बोलावेच लागेलगेल्या वर्षी २२ जानेवारीला अयोध्येत श्री राम मंदिराचे उदघाटन झाले. पण, त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. इतकी कशाची घाई होती? श्री राम यांच्याबद्दल आम्हाला आदर आहेच. पण, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर मोदी, शाह जय श्रीराम बोलूचशकले नसते. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. त्यामुळे आम्ही जसे जय श्रीराम म्हणतो त्याप्रमाणे तुम्हालाही जय शिवराय, जय भवानी बोलावेच लागेल, असे ठाकरे यांनी यावेळी ठणकावले.  

महापालिकेनंतर तुमचे काय होते ते पाहा...आम्ही हरूनही जनता आमचे स्वागत करते. निवडणुकीत बेकायदेशीरपणे यंत्रणा वापरल्या. महापालिकेनंतर तुमचे काय होते ते पाहा. अडीच वर्ष मुख्यमंत्री केले.  आता बसायचे तर बसा नाही तर गावाला निघून जा. मंत्रीपद नाही मिळाले, गेले गावी. दावोसला नेले नाही, गेले गावी. रुसू बाई रुसू गावात जाऊन बसू, असा टोला त्यांनी हाणला.

दगाबाजी भाजपमध्येच१९७८ मध्ये पुलोदचा प्रयोग झाला. त्या सरकारमध्ये जनसंघाचे मंत्री होते. आणीबाणीच्या काळात निवडून आलेला जनता पक्ष फोडण्यात जनसंघ आघाडीवर होता. त्यामुळे दगाबाजी तुमच्यामध्ये दडलेली आहे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMumbaiमुंबई