शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 22:08 IST

Lok Sabha Elections 2024 : पवार-ठाकरेंच्या मुला-मुलींमुळे त्यांचे पक्ष फुटले आणि त्याचा आरोप मात्र भाजपावर लावला जातोय, असा थेट आरोप अमित शाह यांनी केला. 

Amit Shah : धुळे : राज्यात लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडले. आता पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई, ठाण्यासह नाशिक, धुळ्यामध्ये मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर धुळ्यात आज भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह आले होते. यावेळी शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचं आहे आणि उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला राजकारणात पुढे आणायचं आहे, जर पवारांनी मुलीच्या ठिकाणी अजित पवारांना संधी दिली असती आणि उद्धव ठाकरेंनी जर एकनाथ शिंदे यांना संधी दिली असती तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, असा दावा अमित शाह यांनी केला. 

धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ आज अमित शाह यांची सभा पार पडली. यादरम्यान अमित शाह यांनी 'एबीपी माझा'ला मुलाखत दिली. यावेळी अमित शाह यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. शरद पवार जर त्यांच्या मुलीच्या जागी अजित पवारांनी संधी दिली असती आणि उद्धव ठाकरे यांनी जर एकनाथ शिंदे यांना संधी दिली असती, तर त्यांचा पक्ष कधीच फुटला नसता. पवार-ठाकरेंच्या मुला-मुलींमुळे त्यांचे पक्ष फुटले आणि त्याचा आरोप मात्र भाजपावर लावला जातोय, असा थेट आरोप अमित शाह यांनी केला. 

याचबरोबर, अमित शाह यांनी  उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. गेल्या निवडणुकीत त्यांनी माझ्यासमोर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला सहमती दर्शविली होती. निवडणुकीनंतर त्यांच्या मनात मुख्यमंत्री बनण्याचा मोह आला. त्याला आम्ही काही करू शकत नव्हतो. त्यांचा तो व्यक्तिगत निर्णय होता. पंरतु बाळासाहेबांच्या विचारांना सोडून ते काँग्रेस आणि शरद परवारांसोबत गेले. आज औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले आहे. त्याला विरोध करणाऱ्यांसोबत जाऊन बसले आहेत. त्यामुळे आज बाळासाहेबांचा आत्मा दु:खी झाला असेल की नाही, असा सवाल करत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

दरम्यान, धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ आज अमित शाह यांची सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ज्यांचं नाव घेणे सोडले आहे. त्या सावरकरांना माझा नमस्कार. या निवडणुकीत एकीकडे 12 हजार कोटींचे घोटाळे करणारे आणि दुसरीकडे 23-23 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी आहेत. एकीकडे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले तर दुसरीकडे चहा विकणारे नरेंद्र मोदी आहेत. राम मंदिराच्या मुद्द्याला काँग्रेस आणि शरद पवारांनी 70-70 वर्ष अडकवले. ते राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साकारले, असे अमित शाह म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाdhule-pcधुळे