कासा : अल्पवयीन मुलीवर ५५ वर्षीय आरोपीने गावठी औषध देण्याच्या बहाण्याने अत्याचार केल्यानंतर बुधवारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कासा उपजिल्हा रुग्णालयात जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. महाराष्ट्रात घडलेल्या चारही घटना निंदनीय असून, याबाबतीत अशा आरोपींना मदत करणाऱ्यांवरही कठोरातील कठोर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी, त्याचप्रमाणे याबाबतीत कठोर कायदा आणून गुन्हेगारांना शिक्षा व्हावी. या चारही निंदनीय घटनांची माहिती घेण्यात येणार असून, याबाबतीत काही कायदे करणे आवश्यक असल्याचे मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
९० दिवसांमध्ये चार्जशीट दाखल होत नसल्याने नाराजी
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनीही बुधवारी कासा उपजिल्हा रुग्णालयात जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक प्रकरणांमध्ये ९० दिवसांच्या आत चार्जशीट दाखल होत नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या अत्याचार प्रकरणांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा आणण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अंधश्रद्धाविरोधी कायदा अधिक कडक करण्याची गरज असून, तो प्रभावीपणे लागू केला गेला पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. या प्रकरणातील आरोपी भोंदूबाबाला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यास ९ मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
Web Summary : Nilam Gorhe met the victim's family after a minor girl was abused under the guise of medicine. She demands strict action and laws against perpetrators. MLA Rohit Pawar also visited, emphasizing the need for stricter laws and faster charge sheets in such cases.
Web Summary : नीलम गोर्हे ने दवा के बहाने एक नाबालिग लड़की के साथ दुर्व्यवहार के बाद पीड़ित परिवार से मुलाकात की। उन्होंने अपराधियों के खिलाफ सख्त कार्रवाई और कानूनों की मांग की। विधायक रोहित पवार ने भी दौरा किया, ऐसे मामलों में सख्त कानूनों और तेजी से चार्जशीट की आवश्यकता पर जोर दिया।