शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

महायुती सरकारच्या योजना सुरूच राहतील, अजित पवार यांनी केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 00:00 IST

Ajit Pawar News: विधानसभा निवडणुकांनंतर महायुतीचेच सरकार परत येणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका.

पिंपरी  - महायुती सरकारने जाहीर केलेल्या योजना विधानसभा निवडणुकीचा जुमला आहे, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकांनंतर महायुतीचेच सरकार परत येणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका. लोकसभा निवडणुकीनंतर आमचे आमदार पक्षांतर करतील, अशी अफवा विरोधकांनी पसरविली होती. मात्र, एकाही आमदाराने पक्षांतर केले नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकार परिषदेत सांगितले.

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निर्धार मेळावा पार पडला. त्यावेळी अजित पवारांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकारांशी अजित पवारांनी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, महायुती सरकार ‘लाडकी बहीण’ योजना तसेच शेतकऱ्यांसाठी वीज कर्जमाफी, विद्यार्थ्यांना शालेय भत्ते आदी विकासाची कामे करीत आहेत. मात्र, विरोधकांनी ‘मी जॅकेट कुठलं घातलंय’ यात रस आहे. यापेक्षा विकासाच्या गोष्टीवर बोला, असा टोला पवार यांनी लगावला.

‘राज्यसभे’साठी मागणी करणार : पवारराज्यसभेवर पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत महायुतीच्या बैठकीमध्ये मागणी करणार आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, ही माझी वैयक्तिक अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लागलीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्यातही महापालिकेत नवे चेहरे देऊन सगळ्या घटकांना न्याय द्यावा लागेल. ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान विधानसभा निवडणुका लागतील, असे सूचक वक्तव्य पवार यांनी केले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड