शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला धक्का! माजी मंत्र्यांनी हाती घेतली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 15:39 IST

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात विविध क्षेत्रातील आणि पक्षातील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यात अनेक नेत्यांचं पक्षांतरं पाहायला मिळत आहेत. भाजपा नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपा सरकारच्या काळात राजकुमार बडोले यांच्यावर सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी होती. बडोले हे अर्जुनी मोरगाव मतदारसंघात इच्छुक आहेत. ही जागा राष्ट्रवादीकडे जाणार असल्याने तिथे बडोलेंना उमेदवारी दिली जाऊ शकते.

बडोले यांच्या पक्षप्रवेशानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात निवडून येण्यासाठी तिन्ही पक्ष आणि महायुतीतील घटक पक्षांच्या संमतीने जे जे काही शक्य असेल ते करण्यासाठी आमची बोलणी सुरू आहेत.  आम्ही सरकारमध्ये केलेली कामे, जाहिरनामा यावर सांगण्यासारखं भरपूर आहे. कोण कुठे गेले त्यावर लोकांना रस नाही. राज्याचा विकास व्हावा. सर्वांगिण विकास करण्याकडे आमचा कल आहे. जागावाटप अंतिम झाल्यानंतर ते जाहीर केले जाईल असं त्यांनी म्हटलं.

राजकुमार बडोले हे अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून दोनदा भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. महायुतीत सध्या या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. मात्र ही जागा भाजपाला सुटेल अशी अपेक्षा राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली होती. अनेक दिवसांपासून बडोले राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र या अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नका असं बडोले यांनी म्हटलं होते. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मनोहर चंद्रिकापुरे यांनी ७१५ मतांनी बडोलेंचा पराभव केला होता. आता राजकुमार बडोले हे राष्ट्रवादीत आल्याने या जागेवरील दादांसोबत आलेले आमदार चंद्रिकापुरे यांची चिंता वाढली आहे. 

बडोलेंसह इतर पक्षातील नेत्यांनीही केला राष्ट्रवादीत प्रवेश 

हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी पैलवान दीनानाथ सिंह, हिंद केसरी पैलवान अमोल बराटे, हिंद केसरी पैलवान अक्षय हिरगुडे, महाराष्ट्र केसरी पैलवान अक्षय गरुड, उप-महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज वहाग, उप-महाराष्ट्र केसरी पैलवान सागर गरुड, महाराष्ट्र चॅम्पियन ऋषिकेश भांडे, मुंबई केसरी पैलवान आबा काळे, पुणे महापौर केसरी पैलवान सोनबा काळे आदींनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तर सांगली - मिरज - कुपवाड महानगरपालिकेतील विविध पक्षातील नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्षा अ‍ॅड. वसुधा कुंभार, सांगली विधानसभा क्षेत्र शहराध्यक्षा रुकसाना कादरी, मिरजच्या नगरसेविका स्वातीताई पारधी, नगरसेविका राणी मोरे, सां.मि.कु. महानगरपालिकेचे माजी सभापती पुष्पा सोनवणे, माजी नगरसेवक संतोष देवळेकर, माजी नगरसेविका सुरेखा कांबळे, कुपवाड विधानसभा क्षेत्र शहराध्यक्ष प्रवीण बाबर, सांगली शहर युवक उपाध्यक्ष दयानंद टोवळे, संघटक विधानसभा क्षेत्र प्रसाद पाटील आदींचा समावेश आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rajkumar Badoleराजकुमार बडोलेAjit Pawarअजित पवारarjuni-morgaon-acअर्जुनी मोरगावBJPभाजपाMahayutiमहायुतीvidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४