शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 08:43 IST

सुमारे पाच वर्षांनंतर पृथ्वीवर आदळणार म्हणून सांगण्यात आलेल्या लघुग्रहापासून पृथ्वी सुरक्षित राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सुमारे पाच वर्षांनंतर पृथ्वीवर आदळणार म्हणून सांगण्यात आलेल्या लघुग्रहापासून पृथ्वी सुरक्षित राहणार आहे. शुक्रवार १३ एप्रिल २०२९ रोजी अपोफिस नावाचा ३४० किलोमीटर आकाराचा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता होती; पण हा लघुग्रह पृथ्वीवर न आदळता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून फक्त ३२ हजार किलोमीटर अंतरावरून जाणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. 

या लघुग्रहाचा शोध तीन शास्त्रज्ञांनी १९ जून २००४ रोजी लावला होता. शास्त्रज्ञ यावर नजर ठेवून होते. अधिक चैत्र कृष्ण अमावास्या शुक्रवार १३ एप्रिल २०२९ हा दिवस मोठा धोक्याचा दिवस समजला जात होता. कारण हा लघुग्रह या दिवशी पृथ्वीवर आदळण्याची शक्यता होती; पण आता नव्या संशोधनानुसार या दिवशी हा मोठा लघुग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ३२ हजार किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. त्या दिवशी पृथ्वीच्या काही भागातून हा लघुग्रह साध्या डोळ्यांनीही पाहता येईल, असे सोमण यांनी सांगितले. ५२ हजार वर्षांपूर्वी ६० मीटर आकाराचा २० लाख टन वजनाचा एक अशनी पाषाण लोणार येथे आदळला होता. 

आजही तेथे दोन किलोमीटर व्यासाचे दीडशे मीटर खोल अशनी विवर पाहण्यास मिळते. आता अंतराळ विज्ञानात खूप प्रगती झाली आहे. त्यामुळे एखादा धुमकेतू किंवा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता निर्माण झाल्यास शास्त्रज्ञ पृथ्वीला नक्कीच सुरक्षित ठेवू शकतील. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Lonarलोणार