दहावीची फेरपरीक्षा २१ जुलैपासून

By Admin | Updated: June 21, 2015 01:29 IST2015-06-21T01:29:52+5:302015-06-21T01:29:52+5:30

दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी २१ जुलै ते ५ आॅगस्ट या कालावधीत फेरपरीक्षा सलग घेण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या

Tenth test again from July 21 | दहावीची फेरपरीक्षा २१ जुलैपासून

दहावीची फेरपरीक्षा २१ जुलैपासून

पुणे : दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी २१ जुलै ते ५ आॅगस्ट या कालावधीत फेरपरीक्षा सलग घेण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर शुक्रवारी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
दहावीच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून दहावीची आॅक्टोबरमध्ये होणारी फेरपरीक्षा जुलैमध्येच घेण्याचा निर्णय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतला. २१ जुलैला सकाळी साडेदहा ते दिड या वेळेत मराठी आणि अन्य प्रथम भाषांचा पेपर होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी द्वितीय वा तृतीय भाषेचा पेपर होणार आहे.
संकेतस्थळावरील माहितीनुसार, २३ जुलै रोजी इंग्रजीचा पेपर, २४ जुलै रोजी बीजगणित तर २५ जुलै रोजी भूमितीचा पेपर आहे. २८ जुलै रोजी विज्ञान तर २९ जुलै रोजी सामाजिक शास्त्र, ३० जुलै रोजी सामाजिक शास्त्र भाग २ हा पेपर होईल. तर ५ आॅगस्ट रोजी माहिती व तंत्रज्ञान विषयाचा पेपर होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Tenth test again from July 21