शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

फेसबूकवरील बाळासाहेबांच्या आक्षेपार्ह छायाचित्रांमुऴे तणाव

By admin | Updated: June 1, 2014 09:09 IST

फेसबूक या सोशल नेटवर्किगसाईटवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आक्षेपार्ह फोटो टाकल्याने यवतमाळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या या शहरातील तणाव निवळला आहे.

ऑनलाइन टीम

सातारा/यवतमाळ, दि. १ - फेसबूक या सोशल नेटवर्किगसाईटवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आक्षेपार्ह फोटो टाकल्याने यवतमाळ व सातारा येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन एसटी गाड्यांची तोडफोड केली. सध्या या दोन्ही शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे.
काही अज्ञात समाजकंटकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच अन्य काही मान्यवर व्यक्तींच्या फोटोची विटंबना करुन ते छायाचित्र फेसबूकवर अपलोड केली होती. हे छायाचित्र वेगाने पसरु लागल्याने शिवसेना व शिवप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. सातारा येथे शनिवारी रात्री उशीरा शिवप्रेमींनी रस्त्यावर उतरुन विरोधप्रदर्शन केले. संतप्त शिवप्रेमींनी एसटी गाड्यांची तोडफोड केली. तर यवतमाळमध्ये संतप्त शिवसैनिकांनी चार एसटी गाड्यांची तोडफोड केली. सध्या या दोन्ही शहरातील तणाव निवळला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केले आहे. तसेच फेसबूकवरुन हे आक्षेपार्ह फोटो काढून टाकण्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्त आज कोल्हापूरमध्ये बंद पाळण्यात येणार आहे.