शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 03:34 IST

जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडविण्याचे आपले स्वप्न असून, त्यासाठी संधी द्या, असे आवाहन राज यांनी दसऱ्यानिमित्त पॉडकास्टद्वारे जनतेशी संपर्क साधताना केले.

मुंबई : गेली अनेक वर्षे तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांना आणि विशेषत: गेल्या पाच वर्षांत वेड्यावाकड्या युती, आघाड्या करून तुमच्या मतांशी प्रतारणा कणाऱ्यांचा यावेळच्या विधानसभा निवडणुकीत वचपा काढा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केले. 

 जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडविण्याचे आपले स्वप्न असून, त्यासाठी संधी द्या, असे आवाहन राज यांनी दसऱ्यानिमित्त पॉडकास्टद्वारे जनतेशी संपर्क साधताना केले. ते म्हणाले की, दरवेळी तुम्ही बेसावध राहता आणि राजकीय पक्ष आपापले खेळ करत राहतात. महाराष्ट्राची प्रगती कुठे चालली आहे? नुसते रस्ते, फ्लायओव्हर बांधणे ही प्रगती नसते. प्रगती मेंदूतून व्हावी लागते, समाजाची व्हावी लागते. परदेशांनी प्रगती साधली आपण अजूनही चाचपडतोच आहोत. 

प्रगतीच्या थापा अनेकांनी मारल्या; पण तुम्ही त्यांच्याविषयी राग व्यक्त करताना दिसत नाही, उलट त्याच त्याच माणसांना निवडून देता पश्चातापाचा हात कपाळावर मारत राहता. यावेळी  बेसावध राहू नका, शमीच्या झाडावरची शस्रे काढा, ही क्रांतीची वेळ आहे, ही वचपा घेण्याची वेळ आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

मतदानाच्या वेळी तुमची  शस्त्रे जागरूकपणे वापरापांडवांनी शमीच्या झाडावर शस्रे ठेवली होती, तुम्ही ऐन मोक्याच्या वेळी शस्रे झाडावर नेऊन ठेवता. जे मतदानाचे शस्र तुमच्या हातात आहे ते मतदानाच्या दिवशी न वापरता, या सगळ्यांना शिक्षा न करता तुम्ही तुमच्याजवळची शस्रे निवडणुकीनंतर बाहेर काढता आणि या सगळ्या लोकांवर बोलत राहता. 

मतदानाच्या दिवशी जातीपातीचा विचार करून देश उभा राहत नसतो. आता पुन्हा संधी आली आहे, उद्याच्या निवडणुकीत क्रांती करा, आतापर्यंत ज्यांना तुम्ही सांभाळले ते तुमच्या मतांशी प्रतारणा करत आले. तुम्हाला गृहीत धरले गेले, हे दरवेळी जे गृहीत धरणे आहे त्यानेच महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. यावेळी तरी परिस्थिती बदला असेही राज म्हणाले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDasaraदसराMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना