शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

टाटांचा मोलाचा वाटा; स्कील डेव्हलपमेंटसाठी देणार १०,००० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 11:55 IST

राज्य शासनाचा वाटा हा १५00 कोटी रुपयांचा असेल. जूनपासून या उपक्रमास सुरुवात केली जाईल आणि तो टप्प्याटप्प्याने राबविला जाईल.

ठळक मुद्देराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आपण स्वत: आणि टाटा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक झालीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि वेंगुर्लेतील शासकीय विश्रामगृहांच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल.

मुंबई : कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी राज्यातील आयटीआयच्या मुलामुलींना प्रशिक्षित करणे आणि त्यांना रोजगारक्षम करण्यासाठी टाटा ट्रस्ट १० हजार कोटी रुपयांची मदत देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आपण स्वत: आणि टाटा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक झाली आणि त्यात हा उपक्रम राबविण्याचे ठरले. त्यात राज्य शासनाचा वाटा हा १५00 कोटी रुपयांचा असेल. जूनपासून या उपक्रमास सुरुवात केली जाईल आणि तो टप्प्याटप्प्याने राबविला जाईल. त्या अंतर्गत आयटीआयना सुसज्ज आणि आधुनिक रुप दिले जाईल. उद्योगांच्या गरजांनुसार रोजगारांची निर्मिती करणे हे मुख्य सूत्र असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेने याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.मुंबईत हेरिटेज वॉकमुंबईत अनेक हेरिटेज वास्तू आहेत. पर्यटनवाढीच्या दृष्टीने ‘हेरिटेज वॉक’ अशी संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत अशा वास्तूंना पर्यटकांच्या भेटीचे कार्यक्रम आयोजित केले जातील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांना भरीव निधीजिल्हा विकास योजनेत (डीपीसी) मुंबईसह कोकणातील जिल्हा नियोजन मंडळांना भरीव निधी देण्यात आला आहे. डीपीसीला कोणताही कट लावला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

माळशेजमध्ये ग्लास ब्रिजमाळशेज घाटात असलेल्या दीड किलोमीटर लांबीच्या दरीवर ग्लासब्रिज उभारण्याचा प्रस्ताव आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आपली या बाबत चर्चा झाली आहे. हा ब्रिज पर्यटकांचे मोठे आकर्षण केंद्र ठरेल, असे ते म्हणाले.

'कृषी आयटीआय सुरु होणार, राज्यातील ITI कॉलेजचा चेहरामोहरा बदलणार'

ओळखलंत का सर मला, रतन टाटांनी फोटो शेअर केलेला तरुण कोण? 

मालवण, वेंगुर्लेतील विश्रामगृहे सुधारणारसिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि वेंगुर्लेतील शासकीय विश्रामगृहांच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. त्यातील प्रत्येकी २ कोटी रुपये देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Tataटाटाiti collegeआयटीआय कॉलेजAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार