पक्षात घेतले तरी '' त्यांच्या'' वरच्या कारवाया, चौकशी सत्र थांबणार नाहीत : चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 05:08 PM2019-08-02T17:08:15+5:302019-08-02T17:12:55+5:30

आता ज्यांच्यावर फक्त आरोपपत्र दाखल करायचे आहे, अशांना पक्षात घेणार नाही..  

taking in bjp to other party leader but not stop enquiry and action : Chandrakant Patil | पक्षात घेतले तरी '' त्यांच्या'' वरच्या कारवाया, चौकशी सत्र थांबणार नाहीत : चंद्रकांत पाटील 

पक्षात घेतले तरी '' त्यांच्या'' वरच्या कारवाया, चौकशी सत्र थांबणार नाहीत : चंद्रकांत पाटील 

Next
ठळक मुद्देपुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वातार्लाप कार्यक्रम

पुणे: पक्षाने सांगितले तर गडचिरोलीतूनही लढेन. भाजप पक्षात प्रवेश देताना आम्ही प्रत्येकाला तावून सुलाखून घेत आहोत. आमचे खडसे त्यांच्यापेक्षा तावून सुलाखून झालेले आहेत. आता ज्यांच्यावर फक्त आरोपपत्र दाखल करायचे आहे, अशांना पक्षात घेणार नाही,  रोखठोक मत महसूलमंत्री व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. 
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वातार्लाप कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील म्हणाले, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातील काही नेत्यांचे भाजपामध्ये पक्षप्रवेश होत आहेत. मात्र, पक्षात स्थान दिल्यानंतरही राधाकृष्ण विखे यांची मुळाप्रवरा वीज थकबाकी, विजयसिंह मोहिते पाटलांचे ५०० कोटींचे कर्ज या आर्थिक गोष्टींची चौकशी सुरूच राहील. ती थांबणार नाही ग्रामीण, शहरी अशा सर्वच स्तरावर पक्ष मजबूत होत आहे. सर्व ठिकाणी ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते आहेत. मुळात नवीन आलेले चार चेहरे पक्ष बदलणार नाहीत.सध्या महाराष्ट्रात 43 व्यक्तींचे मंत्रिमंडळ आहे. त्यापैकी 13 व्यक्ती शिवसेनेच्या आहेत. 

Web Title: taking in bjp to other party leader but not stop enquiry and action : Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.