दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 05:14 PM2024-05-18T17:14:06+5:302024-05-18T17:14:32+5:30

Alka Kubal : अलका कुबल यांनी अलिकडेच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्यांनी सिनेकारकीर्द आणि खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

Alka Kubal was offered Dada Kondek's movie 'Muka Ghya Muka' but she denide offer | दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यांनी आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. त्यांना खरी ओळख माहेरची साडी या चित्रपटातून मिळाली. आजही लोक हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. अलका कुबल यांनी अलिकडेच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्यांनी सिनेकारकीर्द आणि खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये अलका कुबल यांनी दादा कोंडके यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी त्यांनी दादा कोंडके यांनी त्यांच्या मुका घ्या मुका चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी नाकारली. याबद्दलही सांगितले. त्या म्हणाल्या की, दादा कोंडके यांना शिकारीची खूप आवड होती. त्यामुळे बऱ्याचदा ते शिकारीसाठी निघाले की सेटवर यायचे. त्यांच्याकडे जीप आणि बंदुक असायची. लोकांनी त्यांच्या सिनेमांना नावंदेखील ठेवली की हे कसे चित्रपट बनवतात. पण त्यांच्याशी प्रत्यक्षात बोलताना ते किती हजरजबाबी, हुशार आणि किती विद्वान आहेत, हे कळायचे. 

अलका कुबल यांनी दादा कोंडकेंच्या चित्रपटाची ऑफर नाकारली होती. त्याबद्दल त्या म्हणाल्या की, एकदा त्यांनी मला त्यांच्या एका सिनेमासाठी विचारलं. या सिनेमाचं नाव होतं मुका घ्या मुका. मात्र मी चित्रपटात काम करण्यास नकार दिला. कारण माझा तो जॉनरच नाही. त्यामुळे मी दादांना सांगितलं की, मला खरंच जमणार नाही अशा पद्धतीच्या सिनेमात काम करायला. त्यावेळी माझी प्रेक्षकांमध्ये एक वेगळी इमेज झाली होती. भरपूर असे सिनेमे करत होते. त्यावर ते म्हणाले काही हरकत नाही. मग मी त्यांना म्हटलं दादा रागवू नका. 

Web Title: Alka Kubal was offered Dada Kondek's movie 'Muka Ghya Muka' but she denide offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.