शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंचा पोशिंदा...! अजित पवारांचा घातपात झाला का? विचारल्यावर भाजपला...; सुषमा अंधारेंनी सरकारला घेरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:24 IST

Sushma Andhare question on Ajit Pawar Plane Crash: सोलापूरच्या सभेत सुषमा अंधारे यांनी अजित पवारांच्या निधनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. बंदी असलेल्या विमानाचा वापर का झाला? असा सवाल करत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे.

सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "अजित पवार ही राज्याची संपत्ती होती, पण त्यांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. हा घातपात होता का?" असा खळबळजनक संशय त्यांनी सोलापूरच्या प्रचारसभेत व्यक्त केला.

सुषमा अंधारे यांनी अजित पवार वापरत असलेल्या विमानाबाबत तांत्रिक प्रश्न उपस्थित केले. "आंतरराष्ट्रीय उड्डाण नियामक मंडळाने ज्या विमानावर एक वर्षापूर्वी बंदी घातली होती, तेच विमान अजित दादांच्या प्रवासासाठी का वापरले गेले? स्वतःच्या सुरक्षेबाबत कमालीचे जागरूक असणारे दादा अशा विमानातून प्रवास कसा काय करतील?" असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. 

 "मी आज प्रचाराचा विषय मांडणार नाही, कारण सोन्यासारखा माणूस आपण गमावला आहे. 'लाख जावो, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे' ही आपली संस्कृती आहे. दादांच्या अपघाताबाबत उड्डाण नियामक मंडळाने स्पष्टता द्यायला हवी होती, पण भाजपकडून उत्तरे दिली जात आहेत.हा घातपात होता का? हा प्रश्न विचारण्याचा महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला हक्क आहे. असा प्रश्न उपस्थित होत असताना भाजपला त्याचा राग का येतो" असा सवाल अंधारे यांनी केला. 

पालकमंत्री जयकुमार गोरे यांना टोला 
यावेळी त्यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरही निशाणा साधला. "पालकमंत्री जर पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारासाठी गल्लीगल्लीत सभा घेत असतील, तर उद्या गावच्या गणपती मंडळाचा अध्यक्ष निवडण्यासाठीही ते बैठक घेतात का?" असा खोचक टोला त्यांनी लगावला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sushma Andhare questions Ajit Pawar's plane accident, targets BJP.

Web Summary : Sushma Andhare suspects foul play in Ajit Pawar's plane incident, questioning why a banned plane was used. She criticized BJP's response and Solapur's Guardian Minister's involvement in local elections, emphasizing the need to prioritize human life over political gains.
टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेAjit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाBJPभाजपाJaykumar Goreजयकुमार गोरे