"सुनेत्रा पवार, 'गिधाडां' पासून सावध राहा!" मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक इशारा; पवार कुटुंबाला एकत्र येण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 19:40 IST2026-01-31T19:37:28+5:302026-01-31T19:40:01+5:30

Sunetra Pawar Deputy CM : "गिधाडं घिरट्या घालतायत, ढेकणांपासून सावध राहा! मनोज जरांगे पाटलांचा सुनेत्रा वहिनींना थेट इशारा. पाहा काय म्हणाले जरांगे..."

"Sunetra Pawar, beware of 'vultures'!" Manoj Jarange Patil's sensational warning; Appeal to the Pawar family to come together | "सुनेत्रा पवार, 'गिधाडां' पासून सावध राहा!" मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक इशारा; पवार कुटुंबाला एकत्र येण्याचे आवाहन

"सुनेत्रा पवार, 'गिधाडां' पासून सावध राहा!" मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक इशारा; पवार कुटुंबाला एकत्र येण्याचे आवाहन

जालना/अंतरवाली सराटी: "सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, आता त्यांच्याभोवती 'गिधाडांचा' घेराव वाढू शकतो. त्यांनी अतिशय जपून पावलं टाकावीत," असा खळबळजनक इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर जरांगे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

जरांगे पाटील यांनी सुनेत्रा पवारांना सावध केले आहे. ते म्हणाले, "दादा हे दादा होते. पण आता दादांच्या जाण्यानंतर काही नवीनच 'गिधाडं' त्यांच्याभोवती घिरट्या घालू लागली आहेत. ही नवी 'ढेकणं' खूप रक्त पिऊ शकतात आणि घात करू शकतात. सुनेत्रा वहिनींनी या ढेकणांवर लक्ष ठेवावं."

पवार कुटुंबाच्या एकत्रीकरणावर भाष्य
सुनेत्रा पवार यांनी या कठीण काळात पवार कुटुंबाला सोबत घ्यावे, असा सल्लाही जरांगे यांनी दिला. "संकटकाळी शेवटी कुटुंबच कामाला येतं. पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब एकसंघ झाले तरच राज्यात मोठी मुसंडी मारता येईल. सुनेत्रा पवारांना आता अत्यंत काटेरी रस्त्यावरून चालावे लागणार आहे," असेही ते म्हणाले. तसेच पार्थ आणि जय पवार यांनी आपल्या वडिलांनी दिलेला सल्ला पाळावा, असेही त्यांनी नमूद केले.

धनंजय मुंडेंवर टीका आणि 'घातपात' चौकशीची मागणी
"हे कुठेही पळतं, त्याला काही मिळत नाही. अजित पवार एवढेच फडणवीस हुशार आहेत, ते याला जवळ करणार नाहीत, आतापर्यंत यांचं दुखत होतं. पण यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे." अशी टीका त्यांनी धनंजय मुंडेंवर केली. अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल 'घातपात' असेल तर चौकशी होईलच, असे म्हणत त्यांनी सुनेत्रा पवार यांना आता काटेरी रस्त्यावरून चालावे लागणार आहे, असे म्हटले आहे. 

Web Title : जरंगे पाटिल ने सुनेत्रा पवार को 'गिद्धों' से आगाह किया, एकता का आग्रह किया।

Web Summary : मनोज जरांगे पाटिल ने सुनेत्रा पवार को उनकी नई भूमिका के बाद अवसरवादी 'गिद्धों' से सावधान किया। उन्होंने पारिवारिक एकता पर जोर दिया, सुझाव दिया कि पवार और ठाकरे परिवारों को एकजुट होना चाहिए। उन्होंने धनंजय मुंडे की आलोचना की और अजित पवार की विमान दुर्घटना की जांच की मांग की।

Web Title : Jarange Patil warns Sunetra Pawar of 'vultures,' urges family unity.

Web Summary : Manoj Jarange Patil cautioned Sunetra Pawar against opportunistic 'vultures' following her new role. He stressed family unity, suggesting Pawar and Thackeray families should unite. He also criticized Dhananjay Munde and called for a probe into Ajit Pawar's plane incident.