शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखाने आता भाडेतत्त्वावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 05:40 IST

थकीत कर्जामुळे ताब्यात घेतलेल्या साखर कारखान्यांची विक्री न करता ते भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे.

मुंबई : थकीत कर्जामुळे ताब्यात घेतलेल्या साखर कारखान्यांची विक्री न करता ते भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. यामध्ये बंद कारखान्यांच्या अत्याधुनिकीकरणाचा खर्चसुद्धा भाडेत्त्वावर घेणाऱ्या कंपनीलाच करायचा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील अशा दोन कारखान्यांचा करार बँकेने अलिकडेच केला.बाजारातील अडचणी, चुकीचे व्यवस्थापन अथवा अन्य कारणांमुळे संकटात येऊन कर्ज थकीत झालेले २५ साखर कारखाने महाराष्टÑ राज्य सहकारी बँकेने ताब्यात घेतले आहेत. हे कारखाने बंद पडल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकºयांचे नुकसान होत आहे. यावर मात करण्यासाठी कारखान्यांची खासगी कंपन्यांना विक्री न करता ते भाडेतत्त्वावर देण्याची योजना राज्य सरकारने आखली. त्यासंबंधी सहकार विभाग, महाराष्टÑ सहकारी विकास मंडळाचे प्रतिनिधी, बँकेच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सदस्य अविनाश महागांवकर व संजय भेंडे यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये प्रारंभी बाणगंगा व भाऊसाहेब बिराजदार हे दोन साखर कारखाने २० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला.बँकेच्या प्रशासकीय समितीचे सदस्य संजय भेंडे यांनी सांगितले की, काही कारखाने बंद असल्याने यंत्रसामग्रींचे अत्याधुनिकीरण करावे लागणार आहे. तसेच अन्य काही कामे करायची असल्यास त्याचा खर्च कारखाना भाडेतत्त्वावर घेणाºयांनीच करावा, असे करारात नमूद असेल. त्यासाठी येणाºया भांडवली खर्चाचा परतावा संबंधित कंपनीला मिळावा यासाठीच हा करार २० वर्षांसाठी केला जात आहे. पुढील हंगामापर्यंत आणखी पाच ते सात कारखाने अशाप्रकारे सुरू होऊन शेतकºयांच्या उसाला हक्काचे स्थान मिळावे, असा प्रयत्न केला जात आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेnewsबातम्या