शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी जोरदार रस्सीखेच, सीताराम कुंटे की प्रवीणसिंह परदेशी?  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 12:59 AM

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार हे पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत असून, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि सध्या संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनियुक्तीवर गेलेले प्रवीणसिंह परदेशी यांच्यात मुख्य सचिवपदासाठी चुरस आहे.

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार हे पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत असून, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि सध्या संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनियुक्तीवर गेलेले प्रवीणसिंह परदेशी यांच्यात मुख्य सचिवपदासाठी चुरस आहे. त्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची चर्चा मंत्रालयात आहे. कुंटे हे सध्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. ते आणि परदेशी एकाच बॅचचे अधिकारी असून, दोघेही येत्या नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत. याचा अर्थ दोघांपैकी कुणाही एकाला संधी मिळाली तर मुख्य सचिवपदाचा कार्यकाळ हा नऊ महिन्यांचा असेल.मुख्य सचिवांसारख्या महत्त्वाच्या पदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या धुरिणांचे कोणाच्या नावावर एकमत होते हे महत्त्वाचे असेल. तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता हे त्यांचे वजन कुंटे यांच्या पारड्यात टाकतात, की परदेशी यांच्या हेही महत्त्वाचे मानले जाते. प्रशासनातील मोठे शक्तिकेंद्र म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती मानले जातात. मंत्रालयात आजकाल एका ज्येष्ठ अधिकाऱ्याच्या लॉबीतील अधिकारी रोज चहापानासाठी एकत्र बसतात, अशी चर्चा आहे. लॉबिंगचे तेही एक केंद्र आहे. आयएएस लॉबीचे एक धुरीण आणि एक इच्छुक यांच्यात पुण्याच्या एका सत्ताबाह्य केंद्राने समेट घडविल्याची जोरदार चर्चादेखील आहे.सध्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांची निवृत्तीनंतर महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटीचे (रेरा) नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. याच पदासाठी पुढील महिन्यात निवृत्त होत असलेले एमएमआरडीएचे आयुक्त  आर. ए. राजीव हेही इच्छुक असल्याचे म्हटले जाते. महारेराचे सध्याचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार आहे. निवृत्तीनंतर त्यांची नियुक्ती महारेरामध्ये करण्यात आली होती.

एमपीसीएल, वित्त आयोगातील आयएएस पदे गुंडाळणार!- महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (एमपीसीएल) आणि राज्य वित्त आयोगाच्या प्रमुखपदी पूर्वीपासूनच आयएएस अधिकारी नेमले जातात. मात्र, आता या दोन्ही ठिकाणी आयएएस अधिकारी नेमण्याची गरज नाही, असे उद्योग विभागाने सामान्य प्रशासन विभागाला कळविले असल्याची माहिती आहे. - एमपीसीएलमधून अलीकडेच अरविंदकुमार यांची बदली सहकार व वस्रोद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून करण्यात आली. - तुकाराम मुंढे यांना मानवाधिकार आयोगात, तर डॉ. अश्विनी जोशी यांना विदर्भ विकास मंडळाच्या सदस्य सचिव म्हणून साईड पोस्टिंग दिले.सौनिक यांच्याकडे दोन पदे -वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे. सार्वजनिक बांधकामला पूर्णवेळ अधिकारी देण्यास शासनाला मुहूर्त सापडत नाही. बाजूला सारलेल्या सक्षम अधिकाऱ्यांपैकी एकाला या ठिकाणी संधी दिली जाऊ शकते. पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांच्याकडे उत्पादन शुल्कसह दोन विभागांचा अतिरिक्त कार्यभार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस