शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट औषधांची विक्री थांबता थांबेना

By admin | Updated: January 20, 2015 01:36 IST

अन्न व औषधी प्रशासनाने अनेक प्रयत्न केल्यानंतरही राज्यात निकृष्ट औषधांची विक्री थांबलेली नाही उलट ती दरवर्षी वाढतच चालली आहे. या प्रकारामुळे स्वत:च प्रशासन काळजीत पडले आहे.

श्रीनारायण तिवारी - मुंबईअन्न व औषधी प्रशासनाने अनेक प्रयत्न केल्यानंतरही राज्यात निकृष्ट औषधांची विक्री थांबलेली नाही उलट ती दरवर्षी वाढतच चालली आहे. या प्रकारामुळे स्वत:च प्रशासन काळजीत पडले आहे.अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा अन्न व औषध प्रशासन विभाग बराच कार्यक्षम समजला जातो तरीही खूप वरपर्यंत हात पोहोचलेल्या औषध निर्मात्या कंपन्यांनापुढे त्याने हात टेकले आहेत. अशा कंपन्यांचे हा विभाग काहीही बिघडवू शकलेला नाही. अशा कंपन्यांकडूनच निकृष्ट दर्जाच्या औषधांचा ओघ सुरूच आहे. एफडीए जास्त कार्यक्षम व कठोर होताच काही दिवस त्या औषधांचा पुरवठा कमी होतो व थोड्याच दिवसांत तो पूर्ववत होतो.एफडीएची चिंता वाढलीसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एफडीएने २०१४ च्या एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान जेवढे नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यातील ११.१२ टक्के नमुने निकृष्ट दर्जाचे निघाले. २०१२-२०१३ मध्ये राज्यात एकूण ७५३८ औषधांचे नमुने घेण्यात आले होते त्यातील ३६० नमुने (४.७७ टक्के) निकृष्ट निघाले.२०१३-२०१४ मध्ये ६०९७ औषधांच्या नमुन्यांपैकी ४६४ (७.६४ टक्के) नमुने निकृष्ट निघाले. गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान २५४३ नमुने घेण्यात आले होते त्यापैकी २८३ निकृष्ट दर्जाचे निघाले. निकृष्ट दर्जाच्या औषधांचे प्रमाण दरवर्षी वाढत चालले असल्यामुळे आरोग्य मंत्रालयाची काळजी वाढली आहे. औषधेच जर चांगली नसतील तर रोगी बरा कसा होणार, असा आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा प्रश्न आहे. रोगी बरा झाला नाही तर डॉक्टरांना दोष दिला जातो.उपाययोजनेची तयारीया प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बाजारात निकृष्ट दर्जाच्या औषधांचे प्रमाण फार मोठे असल्याच्या तक्रारी येत असल्याचे मान्य केले. आमचे अधिकारी औषधांच्या नमुन्यांची तपासणी करीत आहेत. या गोष्टीवर आणखी लक्ष्य केंद्रीत करण्याची गरज असून नवी उपाययोजना केली जात असल्याचे भापकर म्हणाले.च्आरोग्य मंत्रालयानुसार एफडीएचे निकष न पाळणारी औषधे बाजारातच येऊ शकत नाहीत. जर अशी औषधे कोणाला फुकट वाटायची असतील तरी त्याला तसे करता येत नाही. असे करताना जर कोणी पकडला गेला तर त्याला शिक्षा होऊ शकते, कारण असे करणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. यामुळे एफडीए वेळोवेळी मेडिकल स्टोअर्सची तपासणी करून त्यांच्याकडील औषधांचे नमुने घेत असते. च्या नमुन्यांची तपासणी एफडीए मुंबई व औरंगाबादेतील आपल्या प्रयोगशाळेतून करून घेत असते. संशय असलेल्या औषधाचा नमुना प्रसिद्ध असलेल्या जवळच्या प्रयोगशाळेत पाठवून त्याची पुन्हा तपासणी केली जाते. जे नमुने तपासणीत नापास होतात त्या बॅचची सगळी औषधे बाजारातून परत मागवून घेतली जातात व संबंधित कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाते.