शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

वाहन परीक्षकांच्या हाती एसटीचे स्टेअरिंगच; वाहतूक नियंत्रक होणार वाहक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 07:43 IST

एसटी महामंडळाने यांत्रिक कर्मचारी व सहायक वाहतूक निरीक्षक यांचा वापर संपकाळात चालक म्हणून तर वाहतूक नियंत्रक यांचा वापर वाहक म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महामंडळाच्यावतीने परिपत्रक जारी केले आहे.

मुंबई : संपात सहभागी असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे वारंवार आवाहन करून देखील कर्मचारी संपावर ठाम आहेत. एसटी महामंडळ त्यांच्यावर कारवाई करत असून देखील कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामध्ये मुख्यतः चालक व वाहक यांचा समावेश असल्याने राज्यात एसटीच्या बसेस रस्त्यावर धावू शकल्या नाहीत. यामुळे आता एसटी महामंडळाने यांत्रिक कर्मचारी व सहायक वाहतूक निरीक्षक यांचा वापर संपकाळात चालक म्हणून तर वाहतूक नियंत्रक यांचा वापर वाहक म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महामंडळाच्यावतीने परिपत्रक जारी केले आहे. पहिल्या टप्प्यात चालक पदावरून वाहन परीक्षक व सहायक वाहतूक निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना २ दिवसांचे प्रशिक्षण देऊन, संपकालावधीत एसटी बसेसवर चालक म्हणून नेमण्यात येणार आहे. तर वाहतूक नियंत्रक म्हणून ज्या वाहकांना पदोन्नती देण्यात आली, त्या वाहतूक नियंत्रकांना संपकालावधीत वाहक म्हणून जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त एसटी बस रस्त्यावर चालविण्याकरिता अशा विविध उपाययोजना अंमलात आणत असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. राज्यातील सर्व एसटी विभाग नियंत्रक, कार्यशाळा व्यवस्थापक व मध्यवर्ती कार्यशाळांना सूचना दिल्या आहेत.ज्या यांत्रिक कर्मचाऱ्यांकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना आहे, अशा कर्मचाऱ्यांची माहिती विभागीय पातळीवर गोळा करून, त्यांच्याकडून प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये तत्काळ ऑनलाईन अर्ज करून बिल्ला काढण्यात यावा, असे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या कर्मचाऱ्यांना ७ दिवसांचे प्रवासी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर समितीचा अहवाल समाधानकारक असल्यास त्या कर्मचाऱ्यांना चालक म्हणून जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संपकालावधीत खातेवाहन व मार्ग तपासणी वाहनांसाठी वापर करण्यात येणार आहे. खाते वाहन व मार्ग तपासणी वाहनांवर नेमणूक केलेल्या चालकांना बसेसवर चालक म्हणून नेमण्यात येणार आहे. संपकाळात चालक आणि वाहक म्हणून नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना दर दिवशी ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपstate transportएसटी