शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सहकारी बँक इथेनॉल निर्मितीसाठी करणार पतपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 19:22 IST

साखरेपासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे...

पुणे : केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन देण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला. त्या पार्श्वभूमीवर राज्य सहकारी बँक देखील साखर कारखान्यांना यंत्रसामग्रीमधे बदल करण्यासाठी पतपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सी मोलॅसिस (मळी), बी हेवी मोलॅसिस आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्याची या पुर्वीच परवानगी दिली आहे. देशात तब्बल १४५ लाख टन साखर शिल्लक आहे. आगामी हंगामात महाराष्ट्र आणि कर्नाटक वगळता देशात चांगले साखर उत्पादन होईल. त्यामुळे पुढील वर्षी देखील साखर शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेपासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. राज्य सहकारी बँकेने जुलै २०१९मध्ये साखर परिषद घेतली होती. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी कृषी मंत्री शरद पवार उपस्थित होते. साखरेपासून इथेनॉल निर्मिती, अंशत: इथेनॉल आणि अंशत: साखर निर्मिती, इथेनॉलच्या किंमतीत वाढ आणि वाहतूक अनुदान देण्याच्या मागणीचा प्रस्ताव राज्य बँकेने केंद्र सरकारला दिला होता. गडकरी यांनी त्याबाबत पुढाकार घेऊन केंद्रीय कृषी आणि पेट्रोलियम मंत्र्यांबरोर बैठक घडवून आणली होती. त्या प्रमाणे केंद्र सरकारने इथेनॉलबाबत निर्णय घेतला असल्याचे दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांना त्यांच्या यंत्रामधे आवश्यक सुधारणा करण्यासाठी जो काही खर्च लागेल, तो राज्य बँक कर्ज रुपाने देण्यास तयार आहे. त्यासाठी आवश्यक तरतूद करण्यात येईल, असेही अनास्कर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेbankबँक