शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सिकलसेलग्रस्तांसाठी विशेष लसीकरण मोफत असावे

By admin | Updated: June 20, 2014 01:07 IST

सिकलसेलग्रस्तांमध्ये प्रतिकार शक्तीचा अभाव असतो. तेव्हा त्यांना लहानपणापासूनच प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या विशेष लसीकरणाची गरज आहे. परंतु हे लसीकरण महागडे आहे. तेव्हा सिकलसेलग्रस्तांसाठी

राज्यस्तरीय सिकलसेल संमेलन : उदय बोधनकर यांचे आवाहन नागपूर : सिकलसेलग्रस्तांमध्ये प्रतिकार शक्तीचा अभाव असतो. तेव्हा त्यांना लहानपणापासूनच प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या विशेष लसीकरणाची गरज आहे. परंतु हे लसीकरण महागडे आहे. तेव्हा सिकलसेलग्रस्तांसाठी हे विशेष लसीकरण मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, असे आवाहन प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांनी केले. जागतिक सिकलसेल दिनानिमित्त सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाच्यावतीने हिंदी मोरभवन सीताबर्डी येथे राज्यस्तरीय सिकलसेल संमेलन आयोजित करण्यात आले होते. एका सिकलसेलग्रस्त मुलीच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. याप्रसंगी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे प्रभारी एम. एस. पिंपळगावकर, डॉ. नवाडे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. बोधनकर यांनी आपल्या भाषणात सिकलसेल आजारावर प्रकाश टाकला. या आजारात औषधोपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणावर येतो. बहुतांश गरीब रुग्ण हा खर्च उचलू शकत नाही. त्यामुळे शासनाने सिकलसेलग्रस्तासाठी मोफत औषधोपचार व्यवस्था केली आहे. परंतु प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या विशेष लसीकरणासाठी मात्र त्यांना ही सुविधा नाही. सिकलसेलग्रस्तांना विशेष लसीकरण आवश्यक असल्याने त्यांना ही सुविधा मोफत देण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. पिंपळगावकर यांनी राजीव गांधी योजनेची माहिती दिली. डॉ. नवाडे यांनी शासनाच्या विविध योजना समजावून सांगितल्या. सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी प्रास्ताविक केले. नीळकंठ पांडे यांनी संचालन केले. प्रमोद धनविजय यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)