शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 18:46 IST

"महायुती मजबूत आहे. आमच्या सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. लाडकी बहीण योजना अत्यंत लोकप्रीय आहे. आमचे सरकार आले, तर आता दीड हजार रुपये आहेत. त्यात वाढ कण्यात येईल आणि ही योजना अजिबात बंद होणार नाही."

मुख्यमंत्री महायुतीचाच होणार. मात्र तो भाजपचा होणार की आणखी कुठला होणार, हे मला माहीत नाही. पण जर त्यांच्यात काही वाद होत असेल तर, मीसुद्धा तयार आहे (मुख्यमत्री पदासाठी), असे रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटले आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी, विधानसभेत महायुतीची सत्ता येणार आणि भाजपचाच मुख्यमंत्री होणार, असे राज ठकारे यांनी म्हटले आहे, आपले काय मत आहे? असा प्रश्न केला असता, रामदास आठवले म्हणाले, "आम्ही सर्वजण येकत्रित बसून ठरवू. आमचाच मुख्यमंत्री होणार, असे भाजपने काही सांगितलेले नाही. मात्र निवडणुकीनंतर जो काही निर्णय आहे, तो आमचे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा आणि आम्ही महाराष्ट्रातील लोक एकत्र बसून, एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, अजित दादा पवार आहेत, मी आहे, आम्ही सर्वजण एकत्र बसूना, आमच्यात कलीही अडचण येणार नाही, दुरावा येणार नाही, या दृष्टीकोणातून मंत्रीमंडळ होईल."

"मुख्यमंत्री कोण असेल, हे आम्ही काही आता सांगू शकत नाही. मात्र मुख्यमत्री महायुतीचाच होणार. यामुळे राज ठाकरे यांच्या मताशी मी सहमत आहे की, मुख्यमंत्री महायुतीचाच होणार. पण तो भाजपचा होणार की आणखी कुठला होणार हे मला माहीत नाही. पण जर त्यांच्यात काही वाद होत असेल तर, मीसुद्धा तयार आहे (मुख्यमत्री पदासाठी)", असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

"लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, आमचे सरकार आले तर पैशांत वाढ कण्यात येईल" -याशिवाय, "महायुती मजबूत आहे. आमच्या सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. लाडकी बहीण योजना अत्यंत लोकप्रीय आहे. आमचे सरकार आले, तर आता दीड हजार रुपये आहेत. त्यात वाढ कण्यात येईल आणि ही योजना अजिबात बंद होणार नाही आणि आम्ही ज्या-ज्या घोषणा केल्या आहेत, त्यांची अंमल बजावणी सरकार आल्यानंतर होईल, अशी खात्री आम्ही देतो. तसेच सर्व दलित आणि बोद्ध मतदारांनी यावेळेला महायुतीच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभे रहायचे आहे, असे मी आमच्या सर्व मतदारांना आवाहन करतो, असेही आठवले यावेळी म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ramdas Athawaleरामदास आठवलेMahayutiमहायुतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस