शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शॉकनंतरच दुरुस्तीचा झटका येणार?

By admin | Updated: June 8, 2017 01:29 IST

अनेकवेळा तक्रार करूनही विद्युत विभागाकडून त्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्करावेत : वाल्हेकरवाडी परिसरातील गुरुद्वारा चौक, चिंतामणी चौक, बळवंतनगर, चिंचवडेनगर, बिजलीनगर आदी भागातील विद्युत बॉक्स आणि फ्युज बॉक्स गेल्या काही दिवसांपासून उघड्या अवस्थेमध्ये असून, अनेकवेळा तक्रार करूनही विद्युत विभागाकडून त्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.विद्युत विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. घरगुती विद्युतपुरवठा करण्याकरिता महावितरणाने मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते अशा सर्व ठिकाणी भूमिगत वाहिन्या टाकून जागोजागी विद्युत बॉक्स बसविले. परंतु या भागातील अनेक विद्युत बॉक्स उघड्या अवस्थेमध्ये आहेत. काही बॉक्सला दरवाजेच नाहीत. परिसरातील काही डीपी बॉक्समुळे अपघात होण्याची शक्यता आहे. बिजलीनगर स्पाईन मार्गालगत असणाऱ्या सर्व्हिस रोडवर, तसेच गुरुद्वारा वाल्हेकरवाडी मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून विद्युतपुरवठा करणारा डीपी बॉक्स उघड्या अवस्थेत आहे. त्याचा दरवाजा निखळला आहे. या मार्गावर अनेक ज्येष्ठ नागरिक लहान मुले घेऊन फेरफटका मारण्यास व जॉगिंगसाठी येतात. त्यामुळे या ठिकाणी केव्हाही मोठा अपघात होऊ शकतो. या मार्गावरून अनेक नागरिक ये-जा करीत असतात. तुकारामनगर, एकवीरा कॉलनी, ओम साई कॉलनी, चिंतामणी चौक, शिवनगरी, बळवंतनगर, चिंचवडेनगर, शिंदे वस्ती, जाधव वस्ती, साईराज कॉलनी, बिजलीनगर , रावेत, पुनावळे परिसरातील अनेक भागातील डीपी बॉक्स दरवाजा आणि कुलपाविना सतत उघड्या अवस्थेत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. पावसाळा तोंडावर आला असताना या समस्येकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे, तरी संबंधित विभागाने परिसरातील उघड्या डीपी बॉक्सला पावसाळ्यापूर्वी त्वरित दरवाजे बसवावेत व प्रत्येक डीपी बॉक्सला कुलूप बसवावे, जेणेकरून डीपीचा परिसर सुरक्षित राहील अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.सध्या शाळांच्या सुटीचे दिवस असून, अनेक मुले अशा धोकादायक पद्धतीने उघड्या अवस्थेत असलेल्या डीपीजवळ सतत खेळत असतात. अशा डीपीमधून विद्युतपुरवठा सतत सुरू असतो. येथून अनेक नागरिक जा-ये करीत असतात. त्यामुळे केव्हाही अपघात होऊ शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने त्वरित परिसरातील डीपी बॉक्सचे दरवाजे बसवून त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने कुलूप बसवावेत - श्रीकांत धनगरअध्यक्ष, जय मल्हार प्रतिष्ठान