शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

"ऑपरेशन कमळ' फसले, हा राजकीय विकृतीचा पराभव', शिवसेनेचं भाजपावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 10:35 AM

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून राजस्थानमधील 'ऑपरेशन कमळ' फसल्याने भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. 'ऑपरेशन कमळ' फसले. हा राजकीय विकृतीचा पराभव असल्याचे आम्ही मानतो असं म्हणत शिवसेनेने भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

मुंबई - राजस्थानमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले राजकीय नाट्य अखेर संपुष्टात आले आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी केलेल्या मनधरणीनंतर राजस्थानमधील युवा नेते सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोह यांच्याविरोधात केलेले बंड मागे घेतले आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून राजस्थानमधील 'ऑपरेशन कमळ' फसल्याने भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे. 'ऑपरेशन कमळ' फसले. हा राजकीय विकृतीचा पराभव असल्याचे आम्ही मानतो असं म्हणत शिवसेनेने भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

''शोले' चित्रपटातील गब्बर सिंगप्रमाणे ऑपरेशन कमळची दहशत निर्माण केलीच होती. 'सो जा बच्चे, नही तो गब्बर आ जायेगा' या धर्तीवर विरोधी सरकारांनी सरळ गुडघे टेकावेत, नाहीतर 'ऑपरेशन कमल हो जायेगा' या भीतीचे सावट निर्माण करायचे. मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ऑपरेशन कमळ’चेच ऑपरेशन करून भाजपला धडा दिला' असं म्हणत शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. तसेच काही ऑपरेशन टेबलावरच फसतात. महाराष्ट्रातही पहाटेचे ऑपरेशन फसले. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे. राजस्थानमधले ऑपरेशन महिनाभर चालले व फसले. भाजपाने आता तरी धडा घ्यावा. थोडे थांबायला काय हरकत आहे. थांबा आणि पुढे जा, वळणावर धोका आहेच असं देखील सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

सचिन पायलट यांनी सांगितलं मोठं कारण" src="https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/sachin-pilot-1_202007456722.jpg"/>

सामनाचा आजचा अग्रलेख

- काँग्रेसने राजस्थानमधील सरकार वाचविण्यात यश मिळवले आहे. बंडखोर नेते सचिन पायलट यांनी दिल्लीत येऊन प्रियंका-राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पायलट यांनी माघार घेतली. काँग्रेस हितासाठी आपण यापुढेही काम करत राहू, असे पायलट यांनी स्पष्ट केले. शुक्रवारपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे व मुख्यमंत्री गेहलोत यांच्याकडे सरकार चालविण्यासाठी स्पष्ट बहुमत आहे. या महिनाभराच्या घोडेबाजारात हसे झाले आहे ते भारतीय जनता पक्षाचे. आपल्या विचारांची नसलेली राज्या-राज्यांतील सरकारे आम्ही चालू देणार नाही किंवा सरळ पाडू हे त्यांचे धोरण आहे, पण राजकीय घमेंडीत त्यांचा सौदा चुकतो व शेअर बाजार गडगडतो. 

- सचिन पायलट यांचे बंड यशस्वी झाले नाही. कारण पहिल्या झटक्यात ते आमदारांचा मोठा आकडा जमवू शकले नाहीत व अशोक गेहलोत यांची खिंड भाजप भेदू शकला नाही. सत्ता व दबावाचे सर्व मार्ग अवलंबून अशोक गेहलोत यांनी राजस्थानच्या भूमीवर सरकार पाडणाऱ्यांना मात दिली. सरकार पाडण्यासाठी जे हातखंडे एरवी भाजप वापरतो, तेच 'उपाय' वापरून गेहलोत यांनी भाजपचा घोडेबाजार उधळला व सचिन पायलट यांचे बंड यशस्वी होऊ दिले नाही. आता राहिलेले काम दिल्लीत प्रियंका व राहुल गांधी यांनी केले आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात जे घडवता आले ते भाजपला राजस्थानच्या युद्धभूमीवर करता आले नाही. 

- गेहलोत यांच्या तुलनेत पायलट हे कमालीचे कच्चे खेळाडू निघाले. म्हणजे महाराष्ट्रात पहाटेचा शपथविधी उरकूनहीजी फसगत झाली, तोच प्रकार सचिन पायलट यांच्याबाबत झाला. पैसा व तपास यंत्रणा हाती असल्यावर प्रत्येक वेळी सरकारे पाडता येतातच असे नाही. मुळात विरोधी पक्षांची सरकारे चालूच द्यायची नाहीत हा अट्टहास लोकशाहीत का बाळगावा? महाराष्ट्रातले सरकार सप्टेंबरपर्यंत पाडूच पाडू असे आता भाजपातील उपऱ्या नेत्यांनी छातीठोकपणे सांगितले. 

- राजस्थानात काम फसफसले तेव्हा आता महाराष्ट्रात पाडापाडीचे काम सुरू करायचे हे कसले धोरण? महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचे व पाडण्याचे प्रयत्न सुरू असतील तर ते त्यांनी खुशाल करावेत, पण त्यासाठी उगाच तोंडाच्या वाफा का दवडता? भाजपवाल्यांना तर झारखंडचे सरकारही पाडायचे आहे, पण त्यांना ते अजून तरी जमलेले नाही. राष्ट्रापुढील सर्व प्रश्न जणू संपले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यात मन रमवण्याचे उद्योग सुरू आहेत. 

- देशावर आर्थिक व बेरोजगारीचे भयंकर संकट कोसळले आहे. त्यावर कोणी ठोसपणे बोलायला तयार नाही. कोरोनाच्या संकटाने लोकांचे जीवन संकटात आले व मृत्यूचा वेग वाढतो आहे. तेसुद्धा राज्यकर्त्यांच्या खिजगणतीत नाही. उद्योग-व्यवसाय पूर्ण कोलमडून पडला आहे. तो सावरण्याऐवजी हे लोक विरोधकांची सरकारे पाडायला निघाले आहेत. 

- महाराष्ट्र असो की राजस्थान, पश्चिम बंगाल असो की झारखंड, तेथे फालतू बखेडे निर्माण करायचे व अस्थिरता निर्माण करायची हे राजकीय मनोरुग्णतेचे लक्षण नव्हे काय? जणू काही भाजपच्या अमलाखालील राज्य सरकारेच काय ती ठीकठाक सुरू आहेत. खरे म्हणजे सगळ्यात जास्त गोंधळ व अराजक त्यांच्याच राज्यांत आहे. बाजूच्या कर्नाटक राज्यातील स्थिती कोरोनामुळे नियंत्रणाबाहेर गेलीच आहे. 

- गुजरातचेही बरे चाललेले नाही, हरयाणात गोंधळ आहे, मणिपुरात अंतर्कलह सुरूच आहेत. गोव्यात कोरोना शिखरावर पोहोचला आहे. बिहारमध्ये 'विकास' हा मुद्दा साफ खड्ड्यात गेल्याने मुंबईतील सुशांतसिंह राजपूत प्रकरणावर राजकीय गुजराण सुरू झाली आहे. खरे तर यांच्यापेक्षा विरोधकांची सरकारे उत्तम चालली आहेत, पण त्यांना केंद्राची अजिबात मदत नाही की सहकार्याची भावना नाही. म्हणूनच राजस्थानात 'ऑपरेशन कमळ' फसले. हा राजकीय विकृतीचा पराभव असल्याचे आम्ही मानतो. 

- 'शोले' चित्रपटातील 'गब्बर सिंग'प्रमाणे 'ऑपरेशन कमळ'ची दहशत निर्माण केलीच होती. ''सो जा बच्चे, नही तो गब्बर आ जायेगा'' या धर्तीवर विरोधी सरकारांनी सरळ गुडघे टेकावेत, नाहीतर 'ऑपरेशन कमल हो जायेगा' या भीतीचे सावट निर्माण करायचे. मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी 'ऑपरेशन कमळ'चेच ऑपरेशन करून भाजपला धडा दिला. काही ऑपरेशन टेबलावरच फसतात. महाराष्ट्रातही पहाटेचे ऑपरेशन फसले. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे. राजस्थानमधले ऑपरेशन महिनाभर चालले व फसले. भाजपने आता तरी धडा घ्यावा. थोडे थांबायला काय हरकत आहे. थांबा आणि पुढे जा, वळणावर धोका आहेच!

महत्त्वाच्या बातम्या

"10 दिवसांत तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना ठार करू", पाकिस्तानातून साक्षी महाराजांना धमकी

बंगळुरू पेटलं! शहरात कलम 144 लागू; पोलिसांवर हल्ला केल्या प्रकरणी 110 जणांना अटक

कोरोना बैठकीत योगींसमोरच मुख्य सचिव खेळत होते गेम, आपने ट्विट केला 'तो' फोटो

लय भारी! बोटीतून निघाला नवरदेव अन् पाहुणे मंडळी पाण्यात, पुरात निघाली हटके वरात

बापरे! बटाट्याच्या भाजीला विरोध केला म्हणून संतापलेल्या पत्नीने पतीला धोपाटण्याने चोपले

यूपीत टवाळखोरांचा उच्छाद! अमेरिकेत स्कॉलरशिप मिळवण्याऱ्या 'तिला' छेडछाडीत गमवावा लागला जीव

'सुशांतचा पाय मुरगळलेल्या अवस्थेत, तुटल्यासारखा...', सुब्रमण्यम स्वामींचा दावा, शवविच्छेदनावर उपस्थित केली शंका 

CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपाSachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र