Join us  

मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला

दिल्ली कॅपिटल्सने आज पुन्हा एकदा पृथ्वी शॉ ( prithvi shaw) याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 4:10 PM

Open in App

IPL 2024, Delhi Capitals vs Mumbai Indians Marathi Live : दिल्ली कॅपिटल्सने आज पुन्हा एकदा पृथ्वी शॉ ( prithvi shaw) याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवले. पृथ्वीने यंदाच्या पर्वात ७ सामन्यांत १६२.२८च्या स्ट्राईक रेटने १८५ धावा केल्या आहेत, तरीही बाहेर बसवल्याने फलंदाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली. DC ने त्यांचे दोन्ही नियमित सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व पृथ्वी यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यात पृथ्वी या निर्णयावर नाराज दिसला आणि नाणेफेक झाल्यानंतर तो मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग याच्याशी हुज्जत घालताना दिसला. हे चित्र पाहून समालोचक आकाश चोप्रा यानेही आश्चर्य व्यक्त केले. 

 ९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिल्लीच्या ताफ्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. कारण, त्यांनाही प्रथम फलंदाजीच करायची होती आणि ती का हे २२ वर्षीय जॅक फ्रेझर मॅकगर्कने दाखवून दिले. त्याने पहिल्याच षटकात ल्यूक वूडच्या गोलंदाजीवर १९ धावा कुटल्या. त्याने जसप्रीत बुमराहच्याही एका षटकात १८ धावा केल्या आणि यंदाच्या पर्वातील मुंबईच्या गोलंदाजाचे हे महागडे षटक ठरले. अभिषेक पोरेलसह त्याने २.४ षटकांत पन्नास धावा फलकावर चढवल्या. फ्रेझरने १५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करण्यासाठी ९ चौकार व ३ षटकार खेचले. यंदाच्या पर्वात त्याने दुसऱ्यांदा १५ चेंडूंत फिफ्टी झळकावली आहे. पहिल्या पॉवर प्लेमध्ये दिल्लीने ९२ धावा उभ्या केल्या आणि त्यात फ्रेझरच्या ७८ धावा होत्या.  दरम्यान, हा सामना पाहण्यासाठी निवड समिती प्रमुख अजित आगरकर स्टेडियमवर उपस्थित होते. २८ व २९ एप्रिलला निवड समितीची भारतीय संघ निवडीसाठी कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत बैठक होणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ निवड करण्यासाठी ही बैठक असणार आहे. पृथ्वी व रिकी पाँटिंग यांच्यातल्या वादाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 

टॅग्स :आयपीएल २०२४पृथ्वी शॉदिल्ली कॅपिटल्समुंबई इंडियन्स