शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-भाजप युती अखेर तुटली

By admin | Updated: September 25, 2014 19:04 IST

गेल्या २५ वर्षापासून महाराष्ट्रात असलेली शिवसेना-भाजपा युती अखेर आज विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून तुटली.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २५ - गेल्या २५ वर्षापासून महाराष्ट्रात असलेली शिवसेना-भाजपा युती अखेर आज  विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून तुटली. महायुतीत आलेल्या घटकपक्षांना न्याय न देवू शकल्याने आणि भाजपाला न्याय मिळत नसल्याने युती तोडण्यात आल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
भाजपाच्या पत्रकार परिषदेला भाजपाचे नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, घटकपक्षाचे नेते महादेव जानकर यांच्यासह भाजपाचे नेते उपस्थित होते. शिवसेना-भाजपा युती ही दिवंगत बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नातून तयार झाली होती. तर गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने चार-पाच घटकपक्षांना सोबत घेवून महायुती आकारास आली होती. परंतू २८८ जागामध्ये मित्रपक्षाला आणि भाजपाला योग्य जागा मिळत नसल्याने घटक पक्षांना न्याय देवू न शकल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. केंद्रीय नेतृत्व हे युती टिकवण्याच्या बाजुचे होते परंतू त्यांनी हा निणर्य कोअर कमिटीवर सोपविला  त्यानंतर कोअर कमिटीने युती तोडण्याचा निर्णय घेतला असे सांगत विधानसभेच्या 
निवडणुकीत भाजपा शिवसेनेवर कोणत्याही प्रकारे टीका करणार नाही. शिवसेनेने केलेल्या टीकेला उत्तर देण्याचे सुध्दा भाजपा टाळणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. महायुतीमध्ये आपल्याला गोपीनाथ मुंडे यांनी आणले होते त्यामुळे पंकजा मुंडे या जिथे असतील तिथे आपण राहिले पाहिजे असे सांगत आपण भाजपासोबत राहणार असल्याची माहिती रासपाचे नेते महादेव जानकर यांनी दिली.