शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शीना बोराचे ‘आरुषी’ होऊ देणार नाही

By admin | Updated: September 7, 2015 02:15 IST

शीना हिच्या हत्येबाबत सबळ पुरावे मिळवीत आहोत, त्यामुळे त्याचे नोएडातील आरुषी तलवार हत्याकांड प्रकरण होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुंबई पोलिसांनी दिली.

मुंबई : शीना हिच्या हत्येबाबत सबळ पुरावे मिळवीत आहोत, त्यामुळे त्याचे नोएडातील आरुषी तलवार हत्याकांड प्रकरण होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुंबई पोलिसांनी दिली. ३० सप्टेंबरपर्यंत या खुनाचा पूर्ण उलगडा करण्याचा आमचा प्रयत्न असून, निर्धारित वेळेत आरोपपत्र न्यायालयात सादर केले जाईल, असे पोलीस दलातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. शीनाच्या हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार व सध्या अटकेत असलेली तिची आई आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि नात्याच्या गुंतागुंतीमुळे खुनाचे गूढ वाढत चालले आहे. ही केस आता मुंबई पोलिसांसाठी प्रतिष्ठेची बाब बनली आहे. ही घटना तीन वर्षांपूर्वीची असल्याने पुरावे गोळा करण्यात काही अडचणी येत आहेत. मात्र या प्रकरणाचे महत्त्व ओळखून गेल्या दीड महिन्यापासून तपास अधिकारी प्रयत्नाची शिकस्त करून सर्व आवश्यक बाबींचा उलगडा करत आहेत. त्यामुळे या हत्येच्या तपासाचा शेवट आरुषी तलवार हत्याकांडाप्रमाणे होणार नाही, याची खात्री पोलिसांना आहे. मीडियाचा अतिरेकमीडिया पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करत आहे. न्यूज चॅनेल्स आरोपीला प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे पुरावे गोळा करण्यात आणि तपासात आम्हाला अडथळे निर्माण होत असल्याबाबत पोलिसांतील उच्चपदस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. आरोपपत्र दाखल करायला तीन महिन्यांचा अवधी असतो. मीडियाला मात्र १० दिवसांत ते सर्व हवे आहे, असा या अधिकाऱ्यांचा सूर आहे.