शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

तिने घेतले मुलीच्या अपंगत्वाचे ओझे

By admin | Updated: June 29, 2014 00:52 IST

घरात आधीच दारिद्र्य. या परिस्थितीतही त्या मातेने आपल्या मुलीला अपंगत्वाचा विचार कधीही शिवू दिला नाही. इतकेच नाही तर त्या अपंगत्वामुळे आपले काहीही बिघडणार नाही, हे तिने तिच्या अंगी भिनवले.

आईच्या मदतीने गायत्रीने संपादन केले यशसुमेध वाघमारे - नागपूर घरात आधीच दारिद्र्य. या परिस्थितीतही त्या मातेने आपल्या मुलीला अपंगत्वाचा विचार कधीही शिवू दिला नाही. इतकेच नाही तर त्या अपंगत्वामुळे आपले काहीही बिघडणार नाही, हे तिने तिच्या अंगी भिनवले. ती स्वत:ही कधीच हतबल झाली नाही आणि मुलीलाही अपंगत्वाचे ओझे वाटू दिले नाही. परिणामी त्या अपंग मुलीनेही अपंगत्वाची सल टोचू न देता यश संपादन केले.अरविंदनगर येथील झोपडपट्टीत राहणारी गायत्री राजू मेश्राम त्या अपंग मुलीचे नाव. गायत्रीला दहावीच्या परीक्षेत ६४ टक्के गुण मिळाले. इतरांच्या नजरेतून हे फार कमी गुण असले तरी ९९ टक्के गुण मिळविणाऱ्या आनंदासारखाच आनंद गायत्रीच्या आई-वडिलांना झाला आहे. विशेषत: जीवाचे रान करणारी तिची आई माया हिला आपल्या पोरीचे किती कौतुक करू असे झाले आहे.पवननगर येथील महाराष्ट्र हायस्कूलची गायत्री विद्यार्थिनी आहे. गायत्री जन्मत:च अपंग. स्वत:चे नैसर्गिक विधीही पार पाडण्यासाठी घ्यावी लागणारी दुसऱ्याची मदत... एकूणच उमेद हरण्याची परिस्थती... असे असतानाही तिच्या आईने अपंगत्व म्हणजे काही शिक्षा नव्हे, तिच्यामध्ये ही विशेषत्वाची जाणीव करून दिली. अपंगत्वावर मात करण्यासाठी ती माता आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. घरापासून शाळा साधारण दोन किलोमीटर अंतरावर. त्यातही धड रस्ता नाही. त्या माऊलीने एका संस्थेच्या मदतीने ट्रायसिकल मिळविली. गायत्रीला त्यात बसवून रोज शाळेत घेऊन जायची.