'ती' २७ गावं पुन्हा कल्याण -डोंबिवलीतून वगळली

By Admin | Updated: September 7, 2015 20:59 IST2015-09-07T20:59:28+5:302015-09-07T20:59:41+5:30

अवघ्या तीन महिन्यांपूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेली २७ गावं पुन्हा महापालिका क्षेत्रातून वगळण्यात आली आहेत.

'She' has withdrawn 27 villages from Kalyan-Dombivali again | 'ती' २७ गावं पुन्हा कल्याण -डोंबिवलीतून वगळली

'ती' २७ गावं पुन्हा कल्याण -डोंबिवलीतून वगळली

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ७ - अवघ्या तीन महिन्यांपूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेली २७ गावं पुन्हा महापालिका क्षेत्रातून वगळण्यात आली आहेत. या गावांची स्वतंत्र नगरपरिषद तयार केली जाण्याची शक्यता आहे. 

२००२ मध्ये कल्याण डोंबिवलीलगतच्या २७ गावांना महापालिका क्षेत्रातून वगळण्यात आले होते. कल्याण डोंबिवलीत येत्या काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणूक होणार असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ जून रोजी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात २७ गावांचा समावेश करण्यात आला होता.  आगामी महापालिका निवडणुकींच नियोजनही यानुसारच करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा राज्य सरकारने या २७ गावांना महापालिका क्षेत्रातून वगळण्यात आले आहे.  

 

Web Title: 'She' has withdrawn 27 villages from Kalyan-Dombivali again