शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्याच्या नेत्रदानाची ‘शौर्य’कथा

By admin | Updated: September 22, 2015 01:46 IST

साडेचार वर्षांच्या चिमुकल्याचा उंचावरून पडून अचानक अंत झाला; मात्र पोटच्या गोळ्याच्या- शौर्यच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवून मातापित्याने त्याच्या इवल्याशा डोळ्यांचे दान करीत समाजासमोर नवा आदर्श ठेवला

नाशिक : साडेचार वर्षांच्या चिमुकल्याचा उंचावरून पडून अचानक अंत झाला; मात्र पोटच्या गोळ्याच्या- शौर्यच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवून मातापित्याने त्याच्या इवल्याशा डोळ्यांचे दान करीत समाजासमोर नवा आदर्श ठेवला.ही ‘शौर्यगाथा’ आहे म्हसरूळच्या हृषीकेश व वैशाली परमार या दाम्पत्याची. या दोघांना शौर्य व साहस अशी दोन मुले. त्यातला मोठा मुलगा शौर्य (वय साडेचार वर्षे) रविवारी दुपारी दुसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र छोट्या मेंदूला गंभीर मार लागल्याने परिस्थिती बिकट होत चालली होती. हृषीकेश परमार हे देहदान चळवळीतील कार्यकर्ते जितेंद्र भावे यांचे जिवलग मित्र. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर शौर्य वाचणार नसल्याचे कळले. भावे यांनी हृषीकेश यांना शौर्यच्या अवयवदानाबाबत विचारले. त्यावर आॅप्टिकलमध्ये नोकरी करणाऱ्या हृषीकेश यांनी अवघ्या मिनिटभरात होकार दिला. त्याबरोबर पुढची चक्रे फिरली. शौर्य हा ‘ब्रेनडेड’ नसून ‘कार्डियाक’ डेड असल्याने तयारी असूनही त्याचे फक्त डोळे व त्वचा हे अवयवच दान करता येतील, असा निष्कर्ष निघाला. दुर्दैवाने त्वचा बॅँक नसल्याने शौर्यचे फक्त डोळेच दान करता आले. सोमवारी पहाटे साडेचार वाजता शौर्यचे निधन झाले; मात्र हे जग सोडतानाही तो दोन गरजूंना दृष्टी देऊन गेला.