शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांविरोधात शरद राव आक्रमक

By admin | Updated: June 14, 2014 04:46 IST

फेरीवाला, महानगरपालिका आणि रिक्षा चालक-मालक संघटनांचे नेतृत्व करणाऱ्या शरद राव यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे

मुंबई : फेरीवाला, महानगरपालिका आणि रिक्षा चालक-मालक संघटनांचे नेतृत्व करणाऱ्या शरद राव यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रिक्षा चालक-मालक, फेरीवाले आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनांची घोषणा करत राव यांनी मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.राज्य सरकारने नेमलेल्या हकिम समितीच्या अहवालानुसार, रिक्षा चालकांना पहिल्या टप्प्यासाठी किमान भाडे म्हणून १८ रुपये देण्याची मागणी राव यांनी केली आहे. आॅटोरिक्षा धंद्याच्या विविध घटकांच्या किमतीत झालेली वाढ आणि घट याचा आढावा या समितीने घेतला होता. त्यानुसार पायाभूत भाडे ठरवून भाडेसारिणी तयार करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. १ मे २०१३ रोजी या सूत्रानुसार रिक्षाचालकांना ४६ पैशांची भाडेवाढ देण्याची गरज होती मात्र ती मिळाली नाही. त्यामुळे १५ लाख रिक्षाचालक आणि मालकांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे राव यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘१ मे २०१४पासूनचे किमान भाडे ठरविण्याबाबत कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. तरीही मुख्यमंत्री उदासीन असल्याने रिक्षा चालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. २० जूननंतर रिक्षाचालकांचे आंदोलन२० जूनपर्यंत शासनाने भाडेवाढ दिली नाही, तर एकाच दिवशी राज्यातील १५ लाख रिक्षाचालक आणि मालक त्या-त्या जिल्ह्यातील वाहतूक आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करतील. नेमके कोणत्या दिवशी आंदोलन करणार, याबाबत राव यांनी सांगितले नाही....तर पालिकाही बंद करणारसध्या मुंबई वगळता इतर महापालिकांत लावलेल्या एलबीटीमुळे १६ हजार ५०० कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे. मात्र एलबीटी रद्द करून व्हॅटवर अतिरिक्त भार लावल्यास केवळ ७६० कोटींचा महसूल मिळणार आहे. त्यामुळे ज्या दिवशी शासन एलबीटी रद्द करेल किंवा एलबीटीच्या धोरणात बदल करेल, त्या रात्रीपासून सर्व महापालिका कामबंद आंदोलन करू,’ असा इशारा राव यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)