"साहेबांचे आशीर्वाद माझ्यासाठी आणि बारामतीकरांसाठी लाखमोलाचे..."; सुनेत्रा पवारांचे भावूक ट्विट, प्रकृतीसाठीही केली प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 18:37 IST2026-04-22T18:09:05+5:302026-04-22T18:37:33+5:30

शरद पवारांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करत सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांच्या भावनांना साद घातली आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर शरद पवारांची अनुपस्थिती आणि सुनेत्रा पवारांचे हे ट्विट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

"Sharad pawar's blessings are worth lakhs for me and the people of Baramati..."; Sunetra Pawar's emotional tweet, also prayed for health | "साहेबांचे आशीर्वाद माझ्यासाठी आणि बारामतीकरांसाठी लाखमोलाचे..."; सुनेत्रा पवारांचे भावूक ट्विट, प्रकृतीसाठीही केली प्रार्थना

"साहेबांचे आशीर्वाद माझ्यासाठी आणि बारामतीकरांसाठी लाखमोलाचे..."; सुनेत्रा पवारांचे भावूक ट्विट, प्रकृतीसाठीही केली प्रार्थना

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वी एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचेशरद पवार हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे उद्या होणाऱ्या मतदानास उपस्थित राहू शकणार नाहीत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ट्विट करत ही माहिती दिली असून, साहेबांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.

ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

सुनेत्रा पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "प्रकृती अस्वास्थ्यामुळे आदरणीय पवार साहेब बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानास उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र त्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी आणि बारामतीकरांसाठी लाखमोलाचे आहेत." बारामतीसह देश आणि राज्याच्या विकासात शरद पवारांचे योगदान प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विकासाची परंपरा कायम राहणार

सुनेत्रा पवार यांनी पुढे म्हटले की, "आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय दादांनीही विकासात्मक राजकारणाची समृद्ध परंपरा जपली आहे. साहेबांनी केलेल्या आवाहनाला बारामतीकर नक्कीच उत्स्फूर्त प्रतिसाद देतील आणि विकासाच्या विचारांची दिशा पुढेही कायम राहील.

शरद पवारांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करत सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांच्या भावनांना साद घातली आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर शरद पवारांची अनुपस्थिती आणि सुनेत्रा पवारांचे हे ट्विट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

Web Title : सुनेत्रा पवार का भावुक ट्वीट: शरद पवार का आशीर्वाद बारामती के लिए अनमोल।

Web Summary : बारामती उपचुनाव से पहले, शरद पवार स्वास्थ्य कारणों से मतदान में शामिल नहीं होंगे। सुनेत्रा पवार ने ट्वीट किया कि उनका आशीर्वाद उनके और बारामती के लोगों के लिए अनमोल है। उन्होंने उनके स्वास्थ्य के लिए प्रार्थना की और विकास में उनके प्रेरणादायक योगदान पर जोर दिया।

Web Title : Sunetra Pawar's emotional tweet: Sharad Pawar's blessings invaluable for Baramati.

Web Summary : Ahead of Baramati by-election, Sharad Pawar will miss voting due to health. Sunetra Pawar tweeted his blessings are invaluable for her and Baramati people. She sought prayers for his health, emphasizing his inspirational contribution to development.