महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 08:37 IST2026-04-23T08:36:24+5:302026-04-23T08:37:48+5:30

Kailas Gaikwad Bribery Case: महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त कैलास गायकवाड यांच्यावर मंगळवारी लाचप्रकरणी केलेल्या कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने रात्रभर त्यांच्या घराची झाडाझडती घेतली.

Navi Mumbai BMC Graft Case: Deputy Commissioner Kailas Gaikwad Remanded to Custody; 38 Tolas of Gold Seized as Political Tensions Rise | महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड

महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त कैलास गायकवाड यांच्यावर मंगळवारी लाचप्रकरणी केलेल्या कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने रात्रभर त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. तपासादरम्यान त्यांच्याकडे ३८ तोळे सोन्यासह एकाच इमारतीमध्ये दोन फ्लॅट असल्याची माहिती समोर आली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली. या कारवाईमागे नवी मुंबईतील शिंदेसेना आणि भाजपच्या वादाची किनार असल्याच्या चर्चेला उधाण आले.

विकासकामांमधून घेतल्या जाणाऱ्या टक्केवारीतून थेट उपायुक्तच एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची प्रकार  घडला.   लाचलुचपत प्रतिबंध विभागाने बुधवारी उपायुक्त कैलास गायकवाड यांच्याच कार्यालयात सापळा रचून ४२ हजार रुपये लाच घेतल्यानंतर पकडले होते. 

नेमकी घडामोड काय?

या प्रकरणतील तक्रारदार डी. के. इंटरप्रायजेसचे दशरथ सुरवसे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली. त्यांनी मेसर्स शांता पाटील कंस्ट्रक्शन कंपनीकडून २०१९ मध्ये कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा विभागात अतिक्रमविरोधी कारवाईला साहित्य व मनुष्यबळ पुरवण्याचे सब कॉन्ट्रॅक्ट घेतले होते. त्याच्या एका बिलाचे २१ लाख रुपये मूळ ठेकेदाराला मिळाल्यानंतर त्यातून २ टक्के बक्षीस स्वरूपात लाचेची मागणी गायकवाड यांनी केली होती. यावेळी सुरवसे यांनी आपण अगोदरच तोट्यात असून हातून गेलेल्या ठेक्यातून एकतरी विभागाचे काम देण्याचीही मागणी 
केली होती.

धडाधड फिरले फोन

गायकवाड यांच्यावर एसीबीची कारवाई होताच राजकीय व्यक्तींकडून एकमेकांना धडाधड फोन फिरले. तक्रारदार हे मनसे पदाधिकारी असल्याने सापळ्यामागे इतर कोण आहे का? याच्या खात्रीसाठी भाजपच्या एका नगरसेवकाने चौकशीची सूत्रे हलवली. भाजपने नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे ओएसडी असलेलेक अतिरिक्त राहुल गेठे यांच्या विरोधात भूमिका घेतली असतानाच भाजपच्या मर्जीतले समजल्या जाणाऱ्या गायकवाड यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे अनेक तर्क लावले जात आहेत.

Web Title : रिश्वत कांड: अधिकारी के घर पर छापा, सोना और फ्लैट बरामद

Web Summary : नगरपालिका अधिकारी कैलास गायकवाड रिश्वत लेते हुए पकड़े गए। छापे में सोना, फ्लैट मिले। 24 अप्रैल तक हिरासत। विकास परियोजनाओं में रिश्वतखोरी के आरोपों के बीच राजनीतिक कोण उभरे। शिकायतकर्ता मनसे सदस्य हैं, जिससे राजनीतिक अटकलें तेज।

Web Title : Bribery Raid: Official's Home Searched, Gold and Flats Discovered

Web Summary : Municipal officer Kailas Gaikwad caught accepting bribe. Raided house reveals gold, flats. Court custody till April 24. Political angles surface amid allegations of bribery in development projects involving kickbacks. Complainant is MNS member, triggering political speculation.