Sharad Pawar Health Update: शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठा दिलासा, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 17:12 IST2026-02-09T17:11:01+5:302026-02-09T17:12:16+5:30

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून त्यांना खाजगी रूममध्ये हलवण्यात आले आहे. डॉ. अभिजीत लोढा आणि रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. वाचा सविस्तर.

Sharad Pawar Health Update: Big relief regarding Sharad Pawar's health, doctor gave important information | Sharad Pawar Health Update: शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठा दिलासा, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती 

Sharad Pawar Health Update: शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठा दिलासा, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती 

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत निर्माण झालेली चिंता आता दूर झाली आहे. त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी आणि आमदार रोहित पवार यांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची अधिकृत माहिती दिली आहे. पवार सध्या कोणाशीही संवाद साधू शकत असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

पवारांवर उपचार करणारे डॉ. अभिजीत लोढा यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, शरद पवार यांना गेल्या दोन-तीन दिवसांपासून कफचा (खोकल्याचा) त्रास जाणवत होता. त्यांच्या सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्या असून सध्या त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्याची गरज भासलेली नाही. ते सध्या रुग्णालयातील एका खाजगी रूममध्ये विश्रांती घेत आहेत. ते सध्या सर्वांशी नॉर्मल बोलत आहेत, काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.


रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना कळकळीचे आवाहन
आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, "शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांना फक्त कफचा त्रास आहे. ते आयसीयूमध्ये नाहीत, तर खाजगी रूममध्ये आहेत. मात्र, उपचारांसाठी त्यांना काही दिवस रुग्णालयातच ठेवले जाईल. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, कृपया रुग्णालयात गर्दी करू नका."

Web Title : शरद पवार का स्वास्थ्य स्थिर; डॉक्टरों ने पुणे से दी राहत भरी खबर

Web Summary : पुणे के रूबी हॉल क्लिनिक में भर्ती होने के बाद शरद पवार का स्वास्थ्य स्थिर है। डॉक्टरों ने पुष्टि की है कि उनकी हालत गंभीर नहीं है, और वह एक निजी कमरे में आराम कर रहे हैं। विधायक रोहित पवार ने समर्थकों से अस्पताल में भीड़ न लगाने का आग्रह किया।

Web Title : Sharad Pawar's health stable; doctors provide reassuring update from Pune

Web Summary : Sharad Pawar's health is stable after being admitted to Ruby Hall Clinic, Pune, due to a cough. Doctors confirm his condition is not critical, and he's resting in a private room. MLA Rohit Pawar urges supporters to avoid crowding the hospital.