मराठवाड्यात भीषण दुष्काळ

By Admin | Updated: August 22, 2015 00:50 IST2015-08-22T00:50:48+5:302015-08-22T00:50:48+5:30

मराठवाड्यातील सर्व प्रकारचे सिंचन प्रकल्प कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर आहेत. मोठे, मध्यम, लघु सिंचन प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ ८ टक्के

A severe drought in Marathwada | मराठवाड्यात भीषण दुष्काळ

मराठवाड्यात भीषण दुष्काळ

मुंबई : मराठवाड्यातील सर्व प्रकारचे सिंचन प्रकल्प कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर आहेत. मोठे, मध्यम, लघु सिंचन प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यात पावसाने पुन्हा एकदा दडी मारली असताना मराठवाड्यावर दुष्काळाचे दाट सावट पसरले आहे.
नागपूर विभागात ६९टक्के, अमरावती विभागात ६१ टक्के, नाशिक विभागात ४१ टक्के, पुणे विभागात ५१ टक्के तर कोकणातील सिंचन प्रकल्पांमध्ये ८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यात गेल्यावर्षी याच दिवशी १८ टक्के पाणीसाठा होता; त्यापेक्षाही वाईट परिस्थिती यंदा आहे.
दुसरीकडे पावसाने दगा दिल्याने दुष्काळाच्या चिंतेत भरच पडत आहे. त्यात कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: A severe drought in Marathwada