शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

By संजय पाठक | Updated: November 14, 2024 09:27 IST

Former MP Harishchandra Chavan passed away: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र देवराम चव्हाण यांचे आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कॉलेज रोड वरील पाटील लेन नंबर दोन येथील त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.

नाशिक-  भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र देवराम चव्हाण यांचे आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कॉलेज रोड वरील पाटील लेन नंबर दोन येथील त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.

पेठ - सुरगाणा या आदिवासी मतदारसंघाच्या राजकारणात सुरुवातीला अपक्ष म्हणून उतरलेले हरिश्चंद्र चव्हाण पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून ते एकदा खासदार तर भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ते सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले  होते. जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीत ते सुरगाणाचे सदस्य तसेच जिल्हा परिषदेतील विविध पदे त्यांनी भूषवली होती.

त्यांचे पार्थिव नाशिक येथील कॉलेजरोडवरील त्यांच्या निवासस्थानी दुपारी एक वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांना ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता सुरगाणा तालुक्यातील प्रतापगड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. चव्हाण यांच्या परिसरात  पश्चात नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी सभापती कलावती चव्हाण, मुलगा समीर, मुलगी स्नेहल असा परिवार आहे.

टॅग्स :Harishchandra Chavanहरिश्चंद्र चव्हाणBJPभाजपाNashikनाशिक