"१०० फुटांवरून विमान कोसळलं, वाचवायला गेले पण..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अजित पवारांच्या अपघाताचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 11:10 IST2026-01-28T11:00:02+5:302026-01-28T11:10:35+5:30

अपघातानंतर अजित पवारांच्या विमानाचा भीषण स्फोट झाल्याने उपमुख्यमंत्र्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला.

Saw it with my own eyes Eyewitnesses recount the horrifying moment Ajit Pawar plane turned into a fireball | "१०० फुटांवरून विमान कोसळलं, वाचवायला गेले पण..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अजित पवारांच्या अपघाताचा थरार

"१०० फुटांवरून विमान कोसळलं, वाचवायला गेले पण..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अजित पवारांच्या अपघाताचा थरार

Ajit Pawar Plane Crash: विमान खाली येत असतानाच ते कोसळणार असं वाटलं होतं आणि क्षणार्धात तेच झालं... डोळ्यांदेखत विमानाचा मोठा स्फोट झाला..." हे शब्द आहेत बारामती विमानतळावर घडलेल्या त्या भीषण अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींचे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघाताने केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. बारामतीमध्ये सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यात उपमुख्यमंत्र्यांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

"आम्ही वाचवण्यासाठी धावलो, पण..."

अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने दिलेली माहिती अंगावर शहारे आणणारी आहे. त्यांनी सांगितले की, "स्वतःच्या डोळ्यांनी हा अपघात पाहिला. खूप दुःखद घटना होती. विमान लँडिंगसाठी खाली येत होते, तेव्हाच काहीतरी अघटित घडणार याची जाणीव झाली. विमान खाली येताना वाटत होतं की ते कोसळेल आणि तितक्यातच ते कोसळले आणि त्यात फोटो स्फोट झाला. आम्ही मदतीसाठी धावलो, पण विमानाने भीषण पेट घेतला होता. आम्ही जवळ पोहोचलो तेव्हा विमानात एकापाठोपाठ एक ४ ते ५ भीषण स्फोट झाले."

मदत करणेही झाले अशक्य

विमानाला लागलेली आग इतकी रौद्र होती की, स्थानिक लोक आणि प्रत्यक्षदर्शी हतबल झाले होते. प्रत्यक्षदर्शी पुढे म्हणाले की, "आम्ही आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण आगीच्या ज्वाळा आणि सतत होणारे स्फोट यामुळे कोणालाही विमानाच्या जवळ जाणे शक्य झाले नाही. त्यातच आम्हाला कळलं की या विमानात खुद्द अजित दादा आहेत... हे सांगतानाही आम्हाला शब्द सुचत नाहीत. वैमानिकाने लँडिगचा प्रयत्न केला असेल पण ते झालं नाही. धावपट्टीवर उतरेल असं वाटत असतानाच जवळपास १०० फुटांवरुन ते कोसळले."

क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले

बारामतीच्या बालेकिल्ल्यात आपल्या लाडक्या नेत्याचे स्वागत करण्यासाठी सज्ज असलेल्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांदेखत हा अपघात घडला. विमानाने पेट घेतल्यामुळे मदतकार्य करणाऱ्यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. विमानाचे अवशेष पाहिल्यावर या अपघाताची भीषणता स्पष्ट होत आहे.

Web Title : बारामती में अजित पवार का विमान दुर्घटनाग्रस्त; दर्दनाक हादसे का मंजर

Web Summary : बारामती में अजित पवार को ले जा रहा विमान दुर्घटनाग्रस्त, पांच की मौत। प्रत्यक्षदर्शियों ने भीषण विस्फोट का वर्णन किया, जिससे बचाव कार्य बाधित हुआ। लैंडिंग के दौरान विमान लगभग 100 फीट से गिरा, जिससे देखने वाले लोग सदमे में थे।

Web Title : Ajit Pawar's Plane Crashes in Baramati; Fatal Accident Witnessed

Web Summary : A plane crash in Baramati, reportedly carrying Ajit Pawar, resulted in five fatalities. Witnesses describe a fiery explosion upon impact, hindering rescue efforts. The aircraft plummeted from approximately 100 feet during landing, devastating onlookers.