शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी निराधार अनुदान बायोमेट्रिक

By admin | Updated: April 2, 2015 03:04 IST

संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ योजना संपूर्णपणे बायोमेट्रिक पद्धतीने राबविण्याचा शासनाचा मानस असून,

मुंबई : संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ योजना संपूर्णपणे बायोमेट्रिक पद्धतीने राबविण्याचा शासनाचा मानस असून, येत्या ६ महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच या योजनेमधील लाभार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले.संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या भत्त्यात वाढ करण्याबाबतचा प्रश्न सदस्य योगेश सागर यांनी उपस्थित केला होता. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याबाबत शासन सकारात्मक आहे, असेही बडोले यांनी यावेळी सांगितले.राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, संजय गांधी निराधार अनुदान योजना ही राज्य शासनाची आहे. केंद्र सरकारची या योजनेतील वयोमयार्दा ६० वर्ष असून राज्यामध्ये ही ६५ वर्ष आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेतील वयोमर्यादेत तफावत असून ही समांतर करण्यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करून एका महिन्यात निर्णय घेण्यात येईल. तसेच या योजनेतील निराधार विधवा, ६० वर्षांवरील निराधार व्यक्ती, रोग पीडित व्यक्ती, अपंग, एक मूल असलेल्या निराधार महिला, निराधारांना योजनेंतर्गत उदरनिवार्हासाठी दिले जाणारे मासिक अर्थसाहाय्य, मानधन अथवा उदरनिर्वाह भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत निश्चित कालावधीत निर्णय घेण्यात येणार आहे, असे कांबळे यांनी या वेळी सांगितले.राज्यमंत्री म्हणाले, त्यांनी या वेळी सांगितले. सदस्य दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, भास्कर जाधव, अब्दुल सत्तार, विजय औटी, बबनराव शिंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला होता. (विशेष प्रतिनिधी)