शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

संजय गायकवाडांनी मारहाण करणं योग्य नाहीच, आम्ही त्याचं समर्थन करत नाही- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 16:16 IST

Eknath Shinde on Sanjay Gaikwad : खराब अन्न दिल्याचा आरोप करून संजय गायकवाडांनी कँटीन कर्मचाऱ्याला केली मारहाण

Eknath Shinde on Sanjay Gaikwad : आमदार निवासातील कँटिनमध्ये शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी गोंधळ घातला. जेवण खराब असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी थेट कँटिनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली. आमदार गायकवाड यांच्या या कारनाम्याचा मुद्दा विधान परिषदेत शिवसेनेचे (यूबीटी) आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला. त्यांनी संजय गायकवाड यांचे निलंबन करण्याचीच मागणी केली. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली. अध्यक्षांना या प्रकरणाची दखल घेऊन काय कारवाई करायची ती करावी, अशी भूमिका मांडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत संजय गायकवाडांना खडेबोल सुनावले.

एकनाथ शिंदे म्हणाले...

संजय गायकवाड यांनी केलेली मारहाण समर्थनीय नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. अन्नाच्या दर्जाबाबत तक्रारी आल्या असतील तर त्यासाठी कायदेशीर कारवाई करता येऊ शकते असे एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले. मारहाण करणे हे पर्याय असू शकत नाही असेही शिंदे स्पष्टपणे म्हणाले. "जे चुकीचं असेल त्यावर कायदेशीर कारवाई करता येऊ शकते. पण मारहाण करणं योग्य नाही. मी मुद्द्यावर संजय गायकवाडला समज देईन. मी त्याला आताही सांगितलं आहे की, असं करणं योग्य नाही. आम्ही याचं समर्थन करत नाही" अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाडांचे कान टोचले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

"मी त्याची माहिती घेतली आणि तो व्हिडीओ मी स्वतः बघितला आहे. अशा प्रकारचे वर्तन आपल्या कुणासाठीही भूषणावह नाही. याच्याने विधिमंडळाची आणि आपल्या सगळ्यांची आणि आमदारांची प्रतिष्ठा, प्रतिमा कमी होते. "माहिती अशी आली की आमदार निवासातील व्यवस्था नीट नव्हती. भाजी वास मारत होती. या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते. त्याच्यावर कारवाई करता येते. तो वेगळा मुद्दा आहे. अध्यक्ष महोद, आमदार निवासामध्ये काहीही अनियमितता असेल, तर आपण स्वतः लक्ष घालावं," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Gaikwadसंजय गायकवाड