शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीवर वाशिम, बुलढाणा जिल्ह्यात ‘ब्लॉक’, ७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान विविध टप्प्यांत काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 15:46 IST

समृद्धी महामार्गावर ‘हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ अंतर्गत गॅन्ट्री बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे ७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई: समृद्धी महामार्गावर ‘’हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’’ (आयटीएमएस) अंतर्गत गॅन्ट्री बसविण्याचे काम आता वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी ७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत एकूण ३५ टप्प्यांत वाहतूक ब्लॉक घेतले जाणार आहेत. या काळात महामार्गावरील संबंधित वाहिनीवरील वाहतूक दररोज ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णतः थांबविण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गावर आयटीएमएस यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड), मंगरूळपीर, मालेगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून जाणाऱ्या १७८.९०० ते २९०.४०० किलोमीटरदरम्यान ही गॅन्ट्री उभारली जाणार आहे. 

समृद्धी महामार्ग: गॅन्ट्री उभारणी कामाचे वेळापत्रक

तारीखठिकाण (साखळी किमी)वाहिनी (बाजू)वेळ
७ फेब्रुवारी१७८.९०० व १७९.७५०मुंबई वाहिनीदुपारी ३ ते ४
७ फेब्रुवारी१७९.७५०नागपूर वाहिनीदुपारी १२ ते १
८ फेब्रुवारी२८४.१०० व २९०.४००नागपूर वाहिनीदुपारी ३ ते ४
८ फेब्रुवारी२९०.४००मुंबई वाहिनीदुपारी १२ ते १
९ फेब्रुवारी१८३.७०० व १८५.५००नागपूर वाहिनीदुपारी १२ ते १
९ फेब्रुवारी१८५.५००मुंबई वाहिनीदुपारी ३ ते ४
१० फेब्रुवारी१९०.४००दोन्ही वाहिन्या (नागपूर व मुंबई)नागपूर: दु. १२-१, मुंबई: दु. ३-४
१२ फेब्रुवारी२०५.४००दोन्ही वाहिन्या (नागपूर व मुंबई)नागपूर: दु. १२-१, मुंबई: दु. ३-४
१४ फेब्रुवारी२०८.८५०दोन्ही वाहिन्या (नागपूर व मुंबई)नागपूर: दु. १२-१, मुंबई: दु. ३-४
१८ फेब्रुवारी२५०.५००दोन्ही वाहिन्या (नागपूर व मुंबई)नागपूर: दु. १२-१, मुंबई: दु. ३-४
२३ फेब्रुवारी२८३.९००दोन्ही वाहिन्या (नागपूर व मुंबई)नागपूर: दु. १२-१, मुंबई: दु. ३-४

प्रवाशांना आवाहन

गॅन्ट्री उभारणीच्या कामामुळे प्रवाशांचा खोळंबा होऊ नये, यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी हे वेळापत्रक पाहून त्यानुसार नियोजन करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

अधिकारी काय म्हणाले?

या महामार्गावर भरधाव वेगाने वाहने धावत असल्याने कामादरम्यान कोणताही अपघात घडू नये यासाठी महामार्गावरील काम सुरू असलेल्या बाजूची वाहतूक काही काळासाठी बंद केली जाणार आहे. काम पूर्ण होताच वाहतूक पुन्हा पूर्ववत केली जाईल, असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Samruddhi Expressway: Traffic blocks in Washim, Buldhana for gantry work.

Web Summary : Traffic blocks on Samruddhi Expressway in Washim and Buldhana districts from February 7-23 due to gantry installation for Highway Traffic Management System (ITMS). Traffic halted for 45-60 minutes in 35 phases. Passengers advised to plan travel accordingly.
टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गTrafficवाहतूक कोंडी