महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास बारामतीत विमान अपघातात निधन झालं आहे. या घटनेनं राज्यात शोककळा पसरली असून नेते, कार्यकर्ते धक्क्यात आहेत. अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"आमच्या राष्ट्रवादी परिवारावर आज दुःखाचा डोंगर कोसळला, दादा नावाच्या व्यक्तीच्या सावलीत असणाऱ्या आम्हा सर्वांना काळाने पोरकं केलं. आमच्या डोक्यावरील आधाराची आणि मायेची सावलीच हिरावून घेतली" असं म्हणत भावुक झाल्या आहेत. रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे.
"आधारस्तंभ हरपला; दादांचं निधन माझ्यासाठी फार मोठी वैयक्तिक हानी, राजकारणापलीकडे..."
"अपघाताच्या आदल्या रात्री बोलणं झालं, माझी मुलगी परत येणार नाही, पण..."; पिंकीच्या आईचा टाहो
"सूर्याच्या साक्षीने दादांचं काम सुरू व्हायचं. काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक माणसाला दादा आपलं काम करतील हा विश्वास वाटायचा हीच दादांची ओळख होती. दादा स्पष्टपणे जितके बोलायचे त्याच्या कैक पटीने जास्त त्यांच्या मनात प्रत्येकाबद्दल आदर आणि आपुलकी असायची. आम्हा सर्वांना दादांची आदरयुक्त भीती होती, संघटनेच्या कामकाजात देखील ते अतिशय स्पष्टपणे सर्व गोष्टी समजावून सांगायचे."
"करतो, बघतो, सांगतो हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हते"; एकनाथ शिंदेंची भावुक पोस्ट
"राष्ट्रवादी पुन्हा, आपला दादा लय रुबाबदार..."; उत्कर्ष शिंदेने सांगितली अजित पवारांची 'ती' आठवण
"शेवटच्या घटकाला केंद्रस्थानी ठेवून आपल्याला पक्ष संघटन मजबूत करायचे आहे, महिलांना राजकारणात जास्तीत जास्त प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायची आहे असे सांगणारे लाडक्या बहिणींचे हक्काचे दादा होते. आजच्या घटनेनंतर खरोखर व्यक्त होण्यासारखे काहीच उरलेले नाही, आमचा सर्व राष्ट्रवादी परिवार आमचे आदर्श असलेल्या नेतृत्वाला पोरका झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली..!" असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
Web Summary : Rupali Chakankar expressed grief over Ajit Pawar's sudden demise in a plane crash, stating that the Nationalist Congress Party (NCP) family has lost its guiding light and support system. She remembers Pawar's dedication to public service and his commitment to empowering women in politics.
Web Summary : रूपाली चाकणकर ने विमान दुर्घटना में अजित पवार के आकस्मिक निधन पर दुख व्यक्त किया, और कहा कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) परिवार ने अपना मार्गदर्शक और समर्थन प्रणाली खो दी है। उन्होंने पवार के सार्वजनिक सेवा के प्रति समर्पण और राजनीति में महिलाओं को सशक्त बनाने की प्रतिबद्धता को याद किया।