शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
3
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
4
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
5
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
6
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
7
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
8
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
9
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
10
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
11
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
12
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
13
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
14
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
15
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
16
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
17
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
18
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
19
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
20
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात गोलमेज परिषद; राज्यातील ५० हून अधिक संघटना सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 06:50 IST

कोरोनामुळे पुण्यात होणारी गोलमेज परिषद रद्द करावी लागली होती. मात्र आता शासनाचे सर्व नियम पाळून २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता रावजी मंगल कार्यालयात ही परिषद होणार आहे.

कोल्हापूर : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाजातील तरुणांसमोर अंधकार पसरला आहे. यासाठी पुन्हा एकदा समाजाची ताकद दाखविण्यासाठी वज्रमूठ बांधायची असून, २३ सप्टेंबरला कोल्हापुरात राज्यस्तरीय गोलमेज परिषदेचे आयोजन केले आहे. यामध्ये राज्यातील ५० हून अधिक संघटना सहभागी होणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे नेते सुरेश पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनामुळे पुण्यात होणारी गोलमेज परिषद रद्द करावी लागली होती. मात्र आता शासनाचे सर्व नियम पाळून २३ सप्टेंबर
रोजी दुपारी १२ वाजता रावजी मंगल कार्यालयात ही परिषद होणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाच्या लढाईचे रणाशिंग फुंकले जाणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.

...तर खासदार, आमदारांच्या पुतळ्याचे दहन
सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असून, महाराष्ट्रातील ४८ खासदारांनी संसदेत आरक्षणाचा प्रश्न रेटून धरून कायदा करण्यास भाग पाडावे. त्याचबरोबर राज्यातील २८८ पैकी १८१ मराठा आमदार आहेत, त्यांनीही आरक्षणासाठी प्रयत्न केले नाहीत तर खासदार, आमदारांच्या पुतळ्यांचे दहन करण्याचा इशारा मराठा आरक्षण समन्वय समितीचे निमंत्रक विजयसिंह महाडिक यांनी या वेळी दिला.

पुण्यात १७ सप्टेंबरला निदर्शने
मराठा क्रांती मोर्चा येत्या १७ सप्टेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सुरक्षित अंतर पाळून निदर्शने करणार आहे.

आंदोलनाची तयारी; लातूरमध्ये आज निदर्शने
लातूर येथे खा. सुधाकर शृंगारे यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी निदर्शने करण्यात येणार आहेत. १७ सप्टेंबरला पालकमंत्री अमित देशमुख यांच्या बाभळगाव येथील निवासस्थानासमोर तसेच अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील आमदारांच्या घरांसमोर निदर्शने केली जाणार आहेत.

अक्कलकोटमध्ये गनिमी कावा
अक्कलकोट (जि. सोलापूर) येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याच कार्यालयासमोर गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण